World Test Championship : कसोटी अजिंक्यपद शर्यतीतून पाकिस्तान बाद, तर बांगलादेश पहिल्या चारांत

World Test Championship : पाकिस्तानला २-० ने हरवल्यावर बांगलादेश संघाने जोरदार मुसंडी घेतली आहे

97
World Test Championship : कसोटी अजिंक्यपद शर्यतीतून पाकिस्तान बाद, तर बांगलादेश पहिल्या चारांत
World Test Championship : कसोटी अजिंक्यपद शर्यतीतून पाकिस्तान बाद, तर बांगलादेश पहिल्या चारांत
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान विरुद्धची कसोटी मालिका २-० ने जिंकून बांगलादेश संघाने इतिहास रचला आहे. कसोटी दर्जा असलेल्या संघाविरुद्ध मालिका विजयाची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे. त्याचवेळी बांगलादेशने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही मोठी मुसंडी मारली आहे. रावळपिंडीतील दुसरी कसोटी बांगलादेशने ६ गडी राखून जिंकली. त्यानंतर कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. पुढील वर्षी जून महिन्यात अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. यात क्रमवारीतील पहिले दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत. या मानाच्या स्पर्धेसाठी बांगलादेशने आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. दुसरीकडे पाकिस्तानचं आव्हान मात्र संपुषटात आलंय. (World Test Championship)

(हेही वाचा- ST Bus Strike : एसटीच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय; कोणत्या आगाराला किती बसला फटका ?)

बांगलादेशने पहिल्या कसोटीतच पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव करून गणित बिघडवले होते. आता पाकिस्तानचा खेळ खल्लास झाला आहे. (World Test Championship)

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला ९ पैकी ७ सामने जिंकणे आवश्यक होते. पण पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही कसोटीत पराभव पत्करला आणि आता गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.  पाकिस्तानने ७ सामन्यांपैकी फक्त २ जिंकले आहेत आणि ५ गमावले आहेत. अशा प्रकारे, त्याच्या खात्यात फक्त १६ गुण आहेत आणि त्याच्या गुणांची टक्केवारी १९.०५ आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानसाठी पुढील वाटचाल खूपच कठीण होणार आहे, कारण त्याचे उर्वरित सामने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांविरुद्ध होणार आहेत. (World Test Championship)

(हेही वाचा- सरकारकडे लाडक्या शेतकऱ्यासाठी पैसे नाहीत – Sanjay Raut)

कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला पुढील सर्व ७ सामने जिंकावे लागतील आणि इतर काही समीकरणांवरही अवलंबून राहावे लागेल. मात्र, त्याचे सामने जिंकणे त्याच्यासाठी सोपे नाही, कारण यातील तीन सामने इंग्लंडविरुद्ध आणि २ सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहेत. त्याचबरोबर पुढील वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध २ सामने होणार आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांना हरवून विजय संपादन करणे सोपे काम म्हणता येणार नाही. (World Test Championship)

त्याचबरोबर बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत गुणतालिकेत दोन स्थानांनी झेप घेतली असून संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशने आत्तापर्यंत ६ सामने खेळले आहेत, ज्यात ३ जिंकले आहेत आणि फक्त ३ गमावले आहेत. अशा प्रकारे त्याच्या खात्यात ३३ गुण असून गुणांची टक्केवारी ४५.८३ झाली आहे. आता फक्त भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड बांगलादेशच्या पुढे आहेत. पाकिस्तानविरुद्धचे दोन कसोटी सामने जिंकल्यानंतर बांगलादेशने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र आता बांगलादेशला आपले उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत. पण आता काही आठवड्यात भारतासोबत २ कसोटी सामने खेळणार आहे. भारताला पराभूत करणे खूप कठीण काम आहे. पण रोहित शर्माच्या टीमने बांगलादेशला हलक्यात घेता येणार नाही. (World Test Championship)

(हेही वाचा- Delhi च्या नायब राज्यपालांचे अधिकार वाढवले; वैधानिक संस्था स्थापन करण्यास सक्षम)

क्रमवारीत भारतीय संघ आपलं अव्वल स्थान राखून आहे. भारतीय संघ सध्या ६८.५१ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे गुण सध्या ६२.५ आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फारच किरकोळ फरक आहेत. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. (World Test Championship)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.