Women’s Test Match at Lords : ऐतिहासिक लॉर्ड्‌सवर पहिल्यांदाच रंगणार महिलांचा कसोटी सामना

Women’s Test Match at Lords : २०२६ मध्ये भारत - इंग्लंड कसोटी सामना लॉर्ड्सवर होणार आहे 

121
Women’s Test Match at Lords : ऐतिहासिक लॉर्ड्‌सवर पहिल्यांदाच रंगणार महिलांचा कसोटी सामना
Women’s Test Match at Lords : ऐतिहासिक लॉर्ड्‌सवर पहिल्यांदाच रंगणार महिलांचा कसोटी सामना
  • ऋजुता लुकतुके

लंडनमधील लॉर्ड्सच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर  प्रथमच महिलांचा कसोटी सामना आयोजित केला जाणार आहे. आणि तो मान भारत आणि इंग्लंड या महिला संघांना २०२६ मध्ये मिळणार आहे. (Women’s Test Match at Lords)

इंग्लंड २०२५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध एक कसोटीही खेळणार आहे, जी दोन्ही संघांमधील २२ वर्षांतील पहिली कसोटी असेल. झिम्बाब्वेनंतर इंग्लिश संघ भारतासोबत ५ कसोटी सामने खेळणार आहे. यानंतर इंग्लंड ॲशेस मालिका खेळण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. (Women’s Test Match at Lords)

(हेही वाचा- Shakib Al Hasan : बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब अल हसनवर खूनाचा गुन्हा दाखल)

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले की, २०२६ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील महिला कसोटी एका खास क्षणी होणार आहे. इंग्लंडच्या महिला संघाने शेवटची कसोटी १९७६ मध्ये लंडनमध्ये दिग्गज रॅशेल हेहो फ्लिंटच्या नेतृत्वाखाली खेळली होती. या विशेष सोहळ्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर कसोटी सामना होणार आहे. (Women’s Test Match at Lords)

एमसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षा आणि इंग्लंडची माजी खेळाडू क्लेअर टेलर म्हणाली, “मी माझ्या कारकिर्दीत १५ कसोटी सामने खेळले, पण लॉर्ड्सवर एकही कसोटी खेळू शकले नाही. त्यामुळे या सामन्याची बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. खासकरून त्या खेळाडूंसाठी मी खूप आनंदी आहे. खूप आनंदी आहे.”  (Women’s Test Match at Lords)

आता इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या तरुणीही क्रिकेटचे माहेरघर असलेल्या लॉर्ड्सवर कसोटी सामना खेळण्याचे स्वप्न पाहू शकतात. यावरून हे देखील सिद्ध होईल की क्रिकेट हा प्रत्येकाचा खेळ आहे.” (Women’s Test Match at Lords)

(हेही वाचा- Mumbai Crime: रक्षकच झाला भक्षक! १७ वर्षीय मुलीवर सुरक्षा रक्षकानेच केला बलात्कार)

इंग्लिश क्रिकेट बोर्डाने २०२४ ते २०२६ सालापर्यंतचा देशातर्गंत क्रिकेट कार्यक्रम अलीकडेच प्रसिद्ध केला. त्यात लॉर्ड्स महिला कसोटीचा उल्लेख आहे. वेस्ट इंडिजचे पुरुष व महिला संघही २०२६ मध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहेत. तर झिंबाब्वेचा संघही २० वर्षांनंतर इंग्लंडच्या दौऱ्यावर जात आहे.  (Women’s Test Match at Lords)

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ रिचर्ड गोल्ड म्हणाले, “झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळणे हा ऐतिहासिक क्षण असेल. दोन्ही देशांनी २० वर्षांपासून एकही कसोटी खेळलेली नाही. विकसित देशांमध्ये कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देणे ही आमची जबाबदारी आहे.” (Women’s Test Match at Lords)

(हेही वाचा- India vs England Test Series : भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये ५ कसोटी खेळणार)

इंग्लंड संघाची झिम्बाब्वेविरुद्धची एकमेव कसोटी पुढील वर्षी २२ मेपासून सुरू होणार आहे. यानंतर संघ भारताविरुद्ध ५ कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना २० जूनपासून सुरू होईल, तर शेवटची कसोटी ३१ जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल. (Women’s Test Match at Lords)

हेही पहा-  
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.