Virat Kohli : विराट कोहली पत्नी अनुष्कासह दिसला लंडनच्या रस्त्यावर, व्हिडिओ व्हायरल 

Virat Kohli : विराट पत्नी अनुष्का आणि दोन्ही मुलांसह सध्या लंडनमध्ये आहे

117
Virat Kohli : विराट कोहली पत्नी अनुष्कासह दिसला लंडनच्या रस्त्यावर, व्हिडिओ व्हायरल 
Virat Kohli : विराट कोहली पत्नी अनुष्कासह दिसला लंडनच्या रस्त्यावर, व्हिडिओ व्हायरल 
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का दुसरा मुलगा अकायच्या जन्मानंतर लंडनमध्येच आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषक आणि श्रीलंकेचा दौरा संपल्यानंतर विराट कोहलीही लंडनला आपल्या कुटुंबीयांकडे परतला आहे. सध्या तो तिथेच आपली सुटी घालवत आहे. अशावेळी अचानक विराटच्या चाहत्यांना लंडनच्या वर्दळीच्या रस्त्यावर या स्टार दांपत्यांचं दर्शन झालं. विराट कोहलीने गुलाबी टी-शर्ट आणि काळी पँट घातली होती. तर अनुष्का पांढरा टी-शर्ट आणि काळ्या पँटमध्ये होती. दोघंही रस्ता ओलांडत होते. आणि त्यांच्या हातात शॉपिंगच्या बॅगा दिसत होत्या. अल्पावधीतच हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(हेही वाचा- Virat Kohli, Rohit Sharma : विराट, रोहित भारतासाठी आणखी किती वर्ष खेळू शकतील?)

असं अचानक विराट कोहलीचं (Virat Kohli) दर्शन झाल्यामुळे लंडनमधील लोकही भांबावले आणि विराटभोवती काही काळ गोळा झालेले दिसले. विराट श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर पुन्हा लंडनला रवाना झाला होता. आणि आता दुलिप करंडकात तो खेळणार नाहीए.

टी-२० विश्वचषकातील विजेतेपदानंतर भारतीय संघाचं लक्ष आता पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आणि कसोटी अजिंक्यपदावर केंद्रीत झालं आहे. त्या दृष्टीने बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका आणि त्यानंतरचा ऑस्ट्रेलियाचा दौरा हा संघासाठी महत्त्वाचा आहे. विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही लंडनमध्ये राहूनच तयारी करत आहे. बांगलादेश मालिकेसाठी तो भारतीय संघात परतेल. (Virat Kohli)

(हेही वाचा- Army Truck Accident: लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळून भीषण अपघात, तीन जवान हुतात्मा, चार जखमी)

बीसीसीआयने अलिकडेच भारतीय खेळाडूंना दुलिप करंडक खेळणं बंधनकारक केलं होतं. पण, विराट आणि रोहीतला नंतर त्यातून वगळण्यात आलं. (Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.