Vinesh on P. T. Usha : विनेश फोगाटचा आता पी. टी. उषावर निशाणा

Vinesh on P. T. Usha : विनेशने काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून ती हरियाणात निवडणूक लढणार आहे.

114
Vinesh on P. T. Usha : विनेश फोगाटचा आता पी. टी. उषावर निशाणा
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे अपात्र ठरलेली विनेश फोगाट आता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्ष पी. टी. उषावर बरसली आहे. वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत अख्खी रात्र घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विनेशला शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे त्रास जाणवत होता. ती ऑलिम्पिक क्रीडा नगरीत रुग्णालयात दाखल झाली होती. तिथे पी. टी. उषा तिला भेटायला गेल्या. त्यांनी तिच्याबरोबरचा फोटोही शेअर केला होता. (Vinesh on P. T. Usha)

(हेही वाचा – Maharashtra TET 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024′ अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर)

आपल्याला संयुक्त रौप्य पदक मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे विनेशने केलेलं अपील फेटाळण्यात आलं. त्यानंतर विनेश मायदेशात परतली असून तिने राजकारणात प्रवेश करताना काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं आहे. हरयाणातील निवडणूक ती लढवणार असल्याचा अंदाज आहे. आता एका स्थानिक वृत्त वाहिनीला हरियाणात मुलाखत देताना तिने ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्ष पी. टी. उषावर तोफ डागली आहे. उषांनी शेअर केलेला फोटो विनेशच्या नकळत काढलेला होता, असाही दावा या मुलाखतीत विनेशने केला आहे. (Vinesh on P. T. Usha)

(हेही वाचा – Rakesh Wadhawan : ‘एचडीआयएल’ ६ कोटींचे साहित्य १८ लाखात विकले; वाधवन यांची पोलिसांत तक्रार)

‘मी रुग्णालयात असताना उषा मॅडम मला भेटायला आल्या. त्यांनी तिथे काढलेला फोटो माझ्या नकळत काढलेला आहे. राजकारण सगळीकडे आहे, असं म्हणतात. मला यावेळी तिथेही राजकारण दिसलं. फोटो काढून काहीतरी मीडिया विधान करून त्या निघून गेल्या. पण, मला प्रत्यक्ष मदत केलीच नाही. खेळांमधील या राजकारणामुळेच मी वैतागले. मला कुस्ती सोडावीशी वाटली ती यामुळे,’ असं विनेश आता म्हणत आहे. उषा यांनी मदतीचा फक्त आव आणला आणि मदत काहीच केली नाही, असा दावा विनेशने केला आहे. (Vinesh on P. T. Usha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.