‘मी बंगळुरू फ्रँचाईजीत जाणार हे ऐकूनच आता कंटाळा आलाय,’ – Rishabh Pant

Rishabh Pant : रिषभ पंतला बंगळुरूचा कर्णधार होण्याची संधी असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली होती 

78
‘मी बंगळुरू फ्रँचाईजीत जाणार हे ऐकूनच आता कंटाळा आलाय,’ - Rishabh Pant
‘मी बंगळुरू फ्रँचाईजीत जाणार हे ऐकूनच आता कंटाळा आलाय,’ - Rishabh Pant
  • ऋजुता लुकतुके 

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या चिडलाय. कारण, आयपीएलच्या पुढील हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) त्याच्याशी संपर्क साधला असल्याची एक बातमी सोशल मीडियावर पसरली आहे. ती खोटी आहे हे सांगता सांगता त्याला नाकी नऊ आले आहेत. अखेर ही बातमी जिथून निर्माण झाली तिथेच पंतने ती हाणून पाडली आहे. खोट्या बातम्या पसरवण्याच्या वृत्तीवरही त्या निमित्ताने भाष्य केलं आहे.

(हेही वाचा- उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेकडून तोडफोड!)

पुढील हंगामात रिषभ पंत (Rishabh Pant) बंगळुरू संघाकडून खेळेल आणि त्याला संघाच्या नेतृत्वासाठी विचारणा केली असल्याची बातमी पसरली होती. इतकंच नाही तर रिषभ पंतला कर्णधार करणं ही बंगळुरू फ्रँचाईजीची राजकीय खेळी होती. विराट कोहलीच्या (Virat Kohli) वर्चस्वाला त्यामुळे धक्का पोहोचवण्याचा फ्रँचाईजीचा विचार होता, असं या खोडसाळ बातमीत म्हटलं होतं.

‘मला या बातमीचं खंडन करून करून कंटाळा आलाय. संघात विष कालवण्यासाठी अशा बातम्या खोडसाळपणे पसरवल्या जातात,’ असं पंतने म्हटलं आहे. (Rishabh Pant)

 ‘ही खोटी बातमी आहे. अशा बातम्या पसरवून लोकांना काय मिळतं? या लोकांनी थोडं जबाबदारीने वागायला हवं. अशा बातम्यांमुळे भारतीय संघात अविश्वासाचं वातावरण पसरू शकतं. असा बातम्या पसरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. किंवा शेवटचीही नाही. पण, अशा बातमीचं खंडन करणं माझं कर्तव्य होतं. तुमचे जे कोणी सूत्र असतील त्यांची माहिती दोनदा तपासा आणि मगच अशा बातम्या पसरवा,’ असं पंतने कडकपणे लिहिलं आहे. (Rishabh Pant)

(हेही वाचा- Narendra Modi Meet Olympiad Teams : नरेंद्र मोदींना भारतीय बुद्धिबळपटूंकडून बुद्धिबळाचा पट भेट )

दोन वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करताना रिषभ पंतने अलीकडेच कसोटीत दमदार शतक ठोकलं आहे. (Rishabh Pant)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.