T20 World Cup, Ind vs Afg : सूर्यकुमार यादवची विराटच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

T20 World Cup, Ind vs Afg : २८ चेंडूंत ५३ धावांच्या खेळीमुळे सूर्यकुमार अफगाणिस्तान विरुद्ध सामनावीर ठरला. 

164
T20 World Cup, Ind vs Afg : सूर्यकुमार यादवची विराटच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
  • ऋजुता लुकतुके

‘मी मागची दोन वर्षं सलग टी-२० प्रकारातील सर्वोत्तम फलंदाज आहे,’ असं अफगाणिस्तान विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी पत्रकारांना म्हणाला होता. त्याला म्हणायचं होतं, ‘तो कठीण वातावरणाशी पण जुळवून घेतो आणि ते घेतलंय म्हणूनच तो अव्वल फलंदाज आहे,’ सूर्यकुमारचं म्हणणं बार्बाडोसच्या फलंदाजांची परीक्षा पाहणाऱ्या सेंट ल्युसिया मैदानावर खरं ठरलं. इतर फलंदाज जिथे थांबून येणारे चेंडू खेळताना बिचकत होते, तिथे सूर्यकुमारने धावांचा वेगही राखला आणि चेंडू अचूक ओळखून सीमापार धाडले. हार्दिक पांड्याबरोबर त्याने ६० धावांची भागिदारी केली आणि भारतीय संघाला सुपर ८ मध्ये महत्त्वाचा विजय मिळवून दिला. (T20 World Cup, Ind vs Afg)

२८ चेंडूंत ५३ धावा करताना त्याने ३ षटकार आणि ५ चौकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळेच भारतीय संघ (Indian Team) १८० च्या पार जाऊ शकला. मग अफगाणिस्तानला १३४ धावांत गुंडाळत हा सामनाही भारताने ४७ धावांनी जिंकला. त्यामुळे सामनावीराचा पुरस्कारही सूर्यकुमारलाच मिळाला आणि त्याचबरोबर सूर्यकुमारने विराट कोहलीचा एक विक्रम मोडला. (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा – India’s Home Series : २०२४-२५ हंगामात भारत इंग्लंड, न्यूझीलंड बरोबर खेळणार मायदेशात कसोटी मालिका)

सूर्यकुमारने आता एकूण १५ वेळा टी-२० प्रकारात सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. या बाबतीत तो आता विराटच्या बरोबर आहे. पण, विराट त्यासाठी १२० सामने खेळलाय. तर सूर्यकुमार फक्त ६४. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू कुठले यावर एक नजर टाकूया, (T20 World Cup, Ind vs Afg)

१५ – सूर्यकुमार यादव (भारत, ६४ सामने)

१५ – विराट कोहली (भारत, १२० सामने)

१४ – विरनदीप सिंग (मलेशिया, ७८ सामने)

१४ – सिकंदर रझा (पाकिस्तान, ८६ सामने)

१४ – मोहम्मद नाबी (अफगाणिस्तान, १२४ सामने)

यादीतील इतर चारही फलंदाजांपेक्षा सूर्याने सगळ्यात कमी सामने खेळले आहेत. सूर्यकुमार आणि विराटच्या मागोमाग मलेशियाचा विरनदीप सिंग, पाकिस्तानचा सिकंदर रझा आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नाबी (प्रत्येकी १४) हे खेळाडू आहेत. (T20 World Cup, Ind vs Afg)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.