T20 World Cup, Aus vs Ban : ऑस्ट्रेलियाचीही सुपर ८ मध्ये विजयाने सुरुवात, बांगलादेशवर २८  धावांनी विजय

T20 World Cup, Aus vs Ban : बांगलादेशची फलंदाजी या सामन्यात घसरली

128
T20 World Cup, Aus vs Ban : ऑस्ट्रेलियाचीही सुपर ८ मध्ये विजयाने सुरुवात, बांगलादेशवर २८  धावांनी विजय
T20 World Cup, Aus vs Ban : ऑस्ट्रेलियाचीही सुपर ८ मध्ये विजयाने सुरुवात, बांगलादेशवर २८  धावांनी विजय
  • ऋजुता लुकतुके

सुपर ८ मधील भारताच्या म्हणजे पहिल्या गटातील ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश हा सामना तसा एकतर्फीच झाला. ढगाळ वातावरणामुळे खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणार हे नक्की होतं. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला गोलंदाजीचा निर्णय घेणं कठीण गेलं नाही. त्याने स्वत: आणि ॲडम झंपाच्या फिरकीने हा निर्णय सार्थही ठरवला. बांगलादेशची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिले चार फलंदाज ८४ धावांत तंबूत परतले. तनझीद हसन (०), लिट्टन दास (१६), रिशाद हुसैन (२), शकीब (८) आणि महमदुल्ला २ धावा करून बाद झाले. (T20 World Cup, Aus vs Ban)

पण, या पडझडीत कर्णधार नजमुल शांतो (Najmul Shanto) खेळपट्‌टीवर ठाम उभा राहिला. ३६ चेंडूंत ४१ धावा करताना त्याने १ षटकार आणि ५ चौकार लगावले. तर त्याला तौहिद ह्रदयने ४० धावा करत चांगली साथ दिली. बांगलादेशने १४० धावा केल्या त्या या दोघांमुळेच. बाकी एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. कमिन्सने ३ तर झंपाने २ बळी मिळवले. (T20 World Cup, Aus vs Ban)

(हेही वाचा- International Yoga Day: आयटीबीपीच्या जवानांनी 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर केली योगासने, Video पहा)

ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने २३ धावांत १ बळी मिळवताना टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक ९५ बळी मिळवण्याचा विक्रम केला. (T20 World Cup, Aus vs Ban)

 ऑस्ट्रेलियन डाव सुरू असताना दोनदा पावसाचा व्यत्यय आला. पण, डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) फटकेबाजीमुळे ऑसी संघ धावगतीच्या बाबतीत कायम आघाडीवर होता. वॉर्नर आणि ट्रेव्हिस हेड (Travis Head) यांनी ६५ धावांची सलामीही संघाला करून दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला अडचण आली नाही. आणि ११ व्या षटकात त्यांच्या २ बाद १०० धावा झाल्या असताना जेव्हा जोरदार पावसाची झड आली तेव्हा ऑसी संघ डकवर्थ – लुईस नियामानुसार, २७ धावांनी पुढे होता.  ऑस्ट्रेलियासाठी डेव्हिड वॉर्नरने ३५ चेंडूंत नाबाद ५३ धावा केल्या. (T20 World Cup, Aus vs Ban)

 पाऊस थांबण्याची शक्यता नाही हे पाहून सामना ऑस्ट्रेलियाला बहाल करण्यात आला. स्थानिक वेळ सव्वा बारा वाजताही सामना सुरू होऊ शकला नाही तेव्हा षटकं कमी करण्यात आली. डकवर्थ लुईस नियमानुसार, ऑस्ट्रेलियाचं आव्हान शंभरच्याही खाली आलं, जे त्यांनी आधीच पार केलं होतं. पहिल्या गटात आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ प्रत्येकी २ गुणांसह पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या गटात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेनं आघाडी घेतली आहे. (T20 World Cup, Aus vs Ban)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.