T20 World Cup, Afg vs Aus : ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळवल्यावर अफगाण ड्रेसिंग रुममध्ये असा झाला विजय साजरा

T20 World Cup, Afg vs Aus : अफगाणिस्तानच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयाने पहिल्या गटातील गणितच बिघडवलं आहे.

159
T20 World Cup, Afg vs Aus : ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळवल्यावर अफगाण ड्रेसिंग रुममध्ये असा झाला विजय साजरा
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना शनिवारी झाला. पण, तो अफगाणिस्तानने जिंकल्यामुळे त्याचा परिणाम अजूनही या विश्वचषकावर जाणवतो आहे. अफगाणिस्तानच्या गोटातून जल्लोषाच्या बातम्या आजही येत आहेत. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचं बाद फेरीचं गणितही बिघडलं आहे. तर अफगाणिस्तानसाठी मागच्या एकदिवसीय विश्वचषकात झालेल्या पराभवाचा वचपा काढल्याचं वातावरण आहे. मुंबईत झालेल्या त्या सामन्यातच अफगाणिस्तान विजयाच्या जवळ आले होते. पण, ग्लेन मॅक्सवेलने त्यांचं गणित बिघडवलं. एकट्या मॅक्सवेलने शतक ठोकत तो सामना अफगाणिस्तानच्या हातून हिरावून घेतला होता. (T20 World Cup, Afg vs Aus)

आता अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य देशाचा पराभव करत ‘जायंट किलर’ असा किताब मिळवला आहे. आणि त्यामुळे संघात रविवारीही जल्लोषाचं वातावरण होतं. ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ मोहम्मद नाबीने शेअर केला आहे. ‘त्यांनी आमचं गणित बिघडवलं होतं, आम्ही आता त्यांना धडा शिकवलाय,’ असं या व्हिडिओत नाबी म्हणतो. (T20 World Cup, Afg vs Aus)

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(हेही वाचा – Drugs Seized : नांदेडहून मुंबईकडे होणारी गांजाची तस्करी मुंबई पोलिसांनी नगरमध्ये रोखली; १२५ किलो गांजा जप्त, चौघांना अटक)

‘एकदिवसीय विश्वचषकात त्यांनी आम्हाला दुखवलं. आता आम्ही त्यांना दुखवलं. हिशोब चुकता झाला आहे,’ असं रहमनुल्ला गुरबाझ म्हणतो. तर गुरबाझ म्हणतो, ‘विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच मी म्हटलं होतं, मी एका विजयासाठी भुकेला आहे.’ (T20 World Cup, Afg vs Aus)

कर्णधार राशिद खान तर सातवे आसमानवर होता. ‘२३ ऑक्टोबर आणि आता २३ जून. माझ्यासाठी २३ शुभ दिवस आहे. हा आकडाच आता माझा सगळ्यात लाडका आहे,’ असं तो अत्यानंदाने म्हणताना दिसतो. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला होता. गुरबाझ आणि झरदान यांनी त्या सामन्यात ११८ धावांची सलामी दिली होती. तर ऑस्ट्रेलियाचा डाव १२४ धावांत गुंडाळला. (T20 World Cup, Afg vs Aus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.