T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकातील खेळपट्ट्यांवर फक्त ३ खेळपट्ट्या खेळण्यासाठी अयोग्य – आयसीसी

T20 World Cup 2024 : खासकरून अमेरिकेतील खेळपट्ट्यांवर माजी खेळाडूंसह सगळ्यांनीच टीका केली होती.

83
T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकातील खेळपट्ट्यांवर फक्त ३ खेळपट्ट्या खेळण्यासाठी अयोग्य - आयसीसी
  • ऋजुता लुकतुके

यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत पार पडली. पहिल्यांदा अमेरिकेत क्रिकेट स्पर्धा होत असल्यामुळे आणि क्रिकेटचा विस्तार नवीन खंडात होत असल्यामुळे त्याबद्दल उत्सुकता होतीच. एरवी आयोजनात कसलीही कसूर झाली नाही. पण, अमेरिकेतील खेळपट्ट्या मात्र आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी तयार नव्हत्या असाच सूर माजी खेळाडूंसह अनेकांनी आळवला. इथं चेंडूला घातक अशी अनियमित उसळी मिळत होती. आता दीर्घ काळानंतर या खेळपट्ट्यांविषयीचा आयसीसीचा अहवाल समोर आला आहे. यात चक्क फक्त तीनच खेळपट्ट्यांविषयी असमाधानकारक असा शेरा आहे. बाकी खेळपट्ट्या खेळण्यासाठी योग्य होत्या, असं आयसीसीचं म्हणणं आहे. न्यूयॉर्कमध्ये एक नवीन तात्पुरते स्टेडियम बांधण्यात आले, ज्याला नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियम असे नाव देण्यात आले. मात्र या मैदानाच्या खेळपट्टीवरुन आयसीसीला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. (T20 World Cup 2024)

या स्टेडियममधील खेळपट्ट्यांवर दिग्गजांनी जोरदार टीका केली होती. या मैदानावर एकही मोठी धावसंख्या बघायला मिळाली नाही. याच मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामनाही झाला होता. इथे तयार केलेल्या चारही खेळपट्ट्या ॲडलेडचे क्युरेटर डॅमियन हफ यांनी तयार केल्या होत्या. मात्र, कोणतीही चाचणी न करता या खेळपट्ट्यांवर सामने घेण्यात आले. खेळपट्ट्यांमध्ये खूप असमान उसळी दिसली, ज्यामुळे फलंदाजांना फलंदाजी करताना खूप अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, येथील खेळपट्टी गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून चांगली ठरली. न्यूयॉर्कच्या आठ सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १०७.६ होती. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – Maharashtra Bandh : चौथ्या शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’; सर्वसामान्यांमध्ये चर्चा)

या खेळपट्टीवरही पंचांनी दर्शवली नापसंती 

आता दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आयसीसीने खेळपट्टीबाबत रेटिंग जाहीर केले आहे. रंजन मदुगले, डेव्हिड बून, जेफ क्रो आणि रिची रिचर्डसन हे न्यूयॉर्क सामन्यांचे चार पंच होते. भारत विरुद्ध पाकिस्तानसह न्यूयॉर्कच्या खेळपट्ट्यांवर खेळल्या गेलेल्या ८ सामन्यांपैकी ६ सामन्यांना ‘समाधानकारक’ मानांकन मिळाले आहे. तर भारत विरुद्ध आयर्लंडसह येथे झालेल्या दोन सामन्यांना ‘असमाधानकारक’ रेटिंग मिळाले. याशिवाय श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील खेळासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवरही पंचांनी नापसंती दर्शवली आहे. तर सुपर-८ मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याची खेळपट्टी ‘समाधानकारक’ मानली गेली. तर केवळ अंतिम सामन्याच्या पृष्ठभागाला ‘खूप चांगली’ असे रेट दिलं गेलं आहे. जूनमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेतील एकूण ५२ सामन्यांपैकी केवळ ३ सामन्यांच्या खेळपट्ट्या ‘असमाधानकारक’ मानल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये तिसरा सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात त्रिनिदाद येथे खेळला गेलेला उपांत्य फेरीचा सामना होता जिथे अफगाणिस्तान ५६ धावांत सर्वबाद झाला होता. (T20 World Cup 2024)

टी२० विश्वचषकात रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला ७ धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा टी-२० विश्वविजेतेपदावर नाव कोरले. रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. भारतानं २००७ नंतर टी २० वर्ल्ड कप जिंकला. यानंतर दोन्ही दिग्गजांनी हिच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.