Sunil Gavaskar : सुनील गावस्करांच्या कर्णधार बदलाच्या सूचनेला बीसीसीआयच्या वाटाण्याच्या अक्षता

Sunil Gavaskar : रोहित शर्मा भारतीय संघात कधी सामील होणार हे अजून अनिश्चित आहे.

64
Sunil Gavaskar : सुनील गावस्करांच्या कर्णधार बदलाच्या सूचनेला बीसीसीआयच्या वाटाण्याच्या अक्षता
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ बोर्डर-गावस्कर चषकासाठी ऑस्ट्रेलियात कसून सराव करत आहे. पण, संघाचा कर्णधार रोहित शर्मा संघाबरोबर सध्या नाही. काही खाजगी कारणामुळे तो पहिली कसोटी खेळणार नाही अशी चर्चा सुरू आहे. पण, प्रशिक्षक गौतम गंभीर यांची अलीकडची काही विधानं ऐकली तर त्याच्या सहभागाविषयीची अनिश्चितता दिसून येते. ‘रोहितच्या पहिल्या कसोटीतील सहभागाविषयी आता तरी काही सांगता येणार नाही. पण, तो पहिली कसोटी खेळणारच नाही, असंही नाही. तो वेळेत ऑस्ट्रेलियाला पोहोचला तर तो पर्थमध्ये खेळेलही,’ असं गंभीरने ऑस्ट्रेलियाला निघण्यापूर्वी बोलून दाखवलं होतं. (Sunil Gavaskar)

पण, या विधानांमुळे गोंधळ आणखी वाढत असल्याचं काही जणांना वाटतं. कृष्णम्माचारी श्रीकांत आणि सुनील गावस्कर यांनीही पूर्वीच उघडपणे यावर बोलून दाखवलं आहे. रोहित पहिली आणि दुसरी कसोटी खेळणार का, हे आधीच स्पष्ट करावं. त्यामुळे संघाला स्थैर्य येतं असं गावस्कर यांचं म्हणणं होतं. (Sunil Gavaskar)

(हेही वाचा – Suryakumar Yadav : हेन्रिक क्लासेनने ‘या’ खेळाडूला म्हटलं टी-२० मधील ‘गोट’)

‘रोहित संघाबरोबर एखादी कसोटी असणार नसेल आणि दुसऱ्या कसोटीबद्दलही अनिश्चितता असेल तर संघा प्रशासनाने वेळेवर निर्णय घ्यायला पाहिजे. उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे अख्ख्या मालिकेसाठी नेतृत्व सोपवता येईल आणि रोहित संघात आल्यावर तो सलामीला नियमितपणे खेळू शकेल. त्यामुळे संघाची घडीही विस्कळीत होणार नाही आणि अनिश्चितताही राहणार नाही,’ असं गावस्कर यांनी बोलून दाखवलं होतं. (Sunil Gavaskar)

तर श्रीकांत यांनीही या मालिकेच्या पलीकडचा विचार मांडला होता. ‘रोहित बहुतेक करून एका वर्षांत निवृत्त होईल. ऑस्ट्रेलियातही तो कदाचित दोन कसोटी खेळणार नाहीए. अशावेळी रोहित नंतर भारतीय नेतृत्व कुणाकडे जाणार हे संघ प्रशासनाने वेळेत स्पष्ट करावं. त्यामुळे संघात गोंधळ निर्माण होत नाही,’ असं श्रीकांत म्हणाले होते. पण, या दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंचा सल्ला सध्या तरी बीसीसीआयने धुडकावून लावलेला दिसतोय. रोहित शर्माला खाजगी कारणासाठी सुट्टी घेण्याचा अधिकार नक्कीच आहे. पण, त्यामुळे संघाची घडी विस्कळीत होऊ नये इतकीच इच्छा. (Sunil Gavaskar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.