Asia Cup 2023 : श्रीलंकेच्या संघाने मोडला भारताचा ‘हा’ विक्रम 

22
Asia Cup 2023 : श्रीलंकेच्या संघाने मोडला भारताचा 'हा' विक्रम 
Asia Cup 2023 : श्रीलंकेच्या संघाने मोडला भारताचा 'हा' विक्रम 

कोलोंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या आशिया चषकातील अंतिम सामन्यात भारताने अवघ्या ५० धावांत श्रीलंकेचा धुव्वा उडवला. (Asia Cup 2023) या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु, त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या तीन गोलंदाजांनी अवघ्या १५.२ षटकांत श्रीलंकेचे सर्व फलंदाज बाद केले. श्रीलंकेला केवळ ५० धावा जमवता आल्या. मोहम्मद सिराजने या सामन्यात ७ षटकांत २१ धावा देत ६ बळी घेतले. तर हार्दिक पांड्याने २.२ षटकांत ३ धावा देत ३ बळी घेतले. जसप्रीत बुमराहने एक बळी घेतला.

(हेही वाचा – Asia Cup 2023 : तब्बल २३ वर्षांनी भारताने काढला श्रीलंकेचा वचपा)

एकदिवसीय स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या

५० धावा ही कोणत्याही एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी भारतीय संघ २००० साली शारजाहमध्ये श्रीलंकेविरुद्ध ५४ धावांत ऑल-आऊट झाला होता. भारताचा हा लाजिरवाणा विक्रम आज श्रीलंकेने मोडला आहे. (Asia Cup 2023)

सर्वोत्तम गोलंदाजी करत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये सिराज तिसरा 

मोहम्मद सिराजने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचे दर्शन घडवले. त्याने तब्बल ६ बळी घेतले. यापैकी ४ बळी त्याने एकाच षटकात घेतले. सिराजने सामन्यातील चौथ्या आणि वैयक्तिक दुसऱ्याच षटकात ही कामगिरी केली. एकाच षटकात ४ बळी घेण्याचा विक्रम सिराजने नोंदवला. ४९ वर्षांच्या भारताच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय गोलंदाजाने एका षटकात ४ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी केली, ६ बळी घेतले, परंतु, त्याला एक विक्रम मोडता आला नाही. एकाच एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा, सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट बिनीच्या नावावर आहे. त्याने २०१४ मध्ये मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ६ षटकांत ४ धावा देत ६ बळी घेण्याचा पराक्रम केला होता. हा विक्रम आधी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर होता. अनिल कुंबळेने १९९३ मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात ६ षटकांत १२ धावा देत ६ बळी घेतले होते. या यादीत सिराजने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने आजच्या सामन्यात ६ षटकांत २१ धावा देत ६ बळी घेतले आहेत. (Asia Cup 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.