Shikhar Dhawan : निवृत्तीनंतर शिखर धवन कोणत्या नवीन इनिंगच्या तयारीत?

Shikhar Dhawan : यापूर्वी शिखरने डबल एक्सएल नावाचा एक सिनेमा केला होता.

74
Shikhar Dhawan : निवृत्तीनंतर शिखर धवन कोणत्या नवीन इनिंगच्या तयारीत?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) अलीकडेच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सध्या तो फक्त आयपीएल लीग खेळणार आहे. निवृत्तीनंतर त्याचे सोशल मीडियावरील जे फोटो व्हायरल होत आहेत, ते पाहून वाटतंय की तो नवीन इनिंगची तयारीही करत आहे. शिखर धवन हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सध्या अभिनेत्री हुमा कुरेशीबरोबर नृत्य करतानाचे त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. हुमाबरोबर २०२२ मध्ये शिखरने एक बॉलिवूड सिनेमा केला होता. आता तो नवीन सिनेमाच्या तयारीत तर नाही ना, असा प्रश्न या फोटोमुळे चाहत्यांना पडला आहे.

२०२२ साली आलेल्या डबल एक्सएल या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकला होता. या सिनेमात त्याच्यासोबत हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा देखील होत्या. यापूर्वी देखील त्याने अभिनय करण्यास तयारी दाखवली होती. पण या सगळ्याचा त्याच्या क्रिकेटवर कोणताही परिणाम होता कामा नये अशी त्याची अट होती. पण, आता क्रिकेट नसल्यामुळे तो सिनेमा किंवा इतर मनोरंजनविषयक कार्यक्रमांना वेळ देऊ शकेल.

(हेही वाचा – kolkata rape case आरोपी संजयने दिली गुन्ह्याची कबुली; म्हणाला, “घटनेपूर्वी रेड लाइट एरियात…”)

त्याला डबल एक्सएल सिनेमाची कथा खूप आवडल्याने तो हा सिनेमा करत असल्याचं तेव्हा शिखरने (Shikhar Dhawan) म्हटलं होतं. पण, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला होता. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘डबल एक्सएल’ या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ २५ लाख रुपयांचे निराशाजनक कलेक्शन केले. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची एकूण कमाई फक्त ६० ते ७० लाख रुपये होती. हा त्या वर्षातील सर्वात मोठा सुपर फ्लॉप होता.

शिखर धवन (Shikhar Dhawan) भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जायचा. विशेष म्हणजे एकदा मैदानावर उतरल्यानंतर तो आक्रमकपणे खेळून समोरच्या गोलंदाजाला घाम फोडायचा. त्याची आक्रमक फलंदाजी पाहूनच गब्बर सिंग हे नाव पडलं होतं. त्याने आतापर्यंत ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय तसेच ६८ टी-२० सामने खेळलेले आहेत. ३८ वर्षीय शिखर धवन साधारण २०२२ पासून भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.