Shakib Al Hasan : शकीब अल हसनचा राग जेव्हा अनावर होतो….

117
Shakib Al Hasan : शकीब अल हसनचा राग जेव्हा अनावर होतो….
Shakib Al Hasan : शकीब अल हसनचा राग जेव्हा अनावर होतो….
  • ऋजुता लुकतुके

एखाद्या खेळाडूचा भर मैदानातच राग अनावर झाला तर तो काय करेल? फुटबॉलच्या मैदानात खेळाडू एकमेकांवर धावून गेलेले आणि मुष्टीयुद्धातही लढत वेगळ्याच पातळीवर गेलेली आपण पाहिली आहे. पण, क्रिकेटच्या मैदानात शकीब अल हसनने (Shakib Al Hasan) आपला राग चक्क पाकिस्तानी खेळाडूवर काढला. त्याच्या चेहऱ्यावर चेंडू फेकून मारला. बांगलादेशने ही कसोटी जिंकली. पण, शकीब अल हसनसाठी ही कृती अंगाशी येणार आहे.

(हेही वाचा- Thane – Borivali Subway मार्गाच्या कामात ठाणे महापालिकेचे सर्वतोपरी सहकार्य)

बांगलादेश संघाचा माजी कर्णधार शकिब अल हसनला (Shakib Al Hasan) मैदानावर खेळाडू आणि पंचांशी गैरवर्तन करताना आपण अनेकदा पाहिले आहे. आता रावळपिंडी कसोटीच्या पाचव्या दिवशी शकीबने चक्क पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानवर चेंडू फेकून मारला.

खरं तर झाले असे की, शकीब गोलंदाजी करत होता. संघाला तेव्हा झटपट बळी मिळवण्याची गरज होती. पण मोहम्मद रिजवान वेळकाढूपणा करत होता. (Shakib Al Hasan)

(हेही वाचा- Ganeshotsav Best Buses : गणेशोत्सवात रात्री बेस्टची सेवा मिळणार का ?; प्रशासनाचा मुंबईकरांना दिलासा)

शाकिबने त्याचा रनअप घेतला. पण, ऐनवेळी रिझवान क्रीझपासून हटला. पण, अशावेळी थांबण्याऐवजी शकीबने त्वेषाने चेंडू त्याच्या अंगावर फेकला. त्यानंतर तो थांबला नाही आणि रागाने चेंडू रिझवानच्या दिशेने फेकला. पण सुदैवाने या चेंडूने कोणालाही दुखापत झाली नाही. तो चेंडू नंतर यष्टीरक्षक लिटन दासने झेलला. शाकिबची ही कृती पाहून अंपायरही चकित झाले. (Shakib Al Hasan)

शाकिबची ही शैली अंपायरला अजिबात आवडली नाही. त्यांनी शाकिबला ताकीदही दिली. पण नंतर शाकिब माफी मागताना दिसला. या घटनेचा व्हिडिओही ट्विटरवर व्हायरल झाला आहे. (Shakib Al Hasan)

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव केला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेशने ५६५ धावा केल्या आणि ११७ धावांची आघाडी घेतली. बांगलादेशने दुसऱ्या डावात पाकिस्तानला १४६ धावांत गुंडाळले. बांगलादेशने ३० धावांचे लक्ष्य १० गडी राखून पूर्ण केले. मुशफिकर रहीमला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. (Shakib Al Hasan)

(हेही वाचा- Dahi Handi 2024 : ठाण्यात 55 लाखांची गोकुळ हंडी वेधणार लक्ष)

२०२१ मध्ये रावळपिंडीमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानने घरच्या भूमीवर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. दरम्यान, पाच सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले तर चार सामने अनिर्णित राहिले. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे. (Shakib Al Hasan)

हेही पहा-  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.