Shakib Al Hasan : शकीब अल हसनवर अटकेची टांगती तलवार

Shakib Al Hasan : शकीब अल हसनवर राजकीय हत्येचा आरोप आहे आणि गुन्हा दाखल आहे

124
Shakib Al Hasan : शकीब अल हसनवर अटकेची टांगती तलवार
Shakib Al Hasan : शकीब अल हसनवर अटकेची टांगती तलवार
  • ऋजुता लुकतुके

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन (Shakib Al Hasan) सध्या पाकिस्तानबरोबर कसोटी मालिका खेळतोय. बांगलादेश ही ऐतिहासिक मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याचवेळी माजी कर्णधार आणि संघातील प्रमुख खेळाडू शकीब अल हसनवर चक्क अटकेची टांगती तलवार आहे. राजकीय हत्येचा गुन्हा त्याच्यावर असून त्याच्यावर कधीही अटकेची कारवाई होऊ शकते.

बांगलादेशची राजधानी ढाका इथं अदाबोर पोलीस ठाण्यात रफिकुल इस्लाम नावाच्या व्यक्तीने शकीब अल हसनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनेदरम्यान रफिकुलचा मुलगा रुबेल याचा ७ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. ढाक्यातील रिंग रोडवर झालेल्या आंदोलनादरम्यान रुबेलच्या छातीत आणि पोटात गोळ्या लागल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रफीकुल इस्लामने नमूद केलेल्या आरोपींच्या यादीत एकूण १५४ जणांचा समावेश आहे. आरोपींच्या यादीत शाकिबचे नाव २८ व्या क्रमांकावर असून त्याच्याशिवाय बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमद याच्यावरही हत्येचा आरोप आहे. २०२३ मध्ये अवामी लीग पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आल्याने साकिबही निशाण्यावर आला आहे.   (Shakib Al Hasan)

(हेही वाचा- Heavy Rain: मराठवाडा, विदर्भाला पुराचा फटका! १२ जणांचा मृत्यू, पिके वाहून गेली, जनावरे दगावली)

सत्तापालट होण्यापूर्वी शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून कार्यरत होत्या. क्रिकेटर शाकिब अल हसन आणि इतर अनेक कलाकारांशिवाय रफिकुल इस्लामने (Rafiqul Islam) आपल्या मुलाच्या हत्येच्या आरोपात माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचेही नाव घेतले आहे. सध्या १५४ लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, परंतु त्यांच्याशिवाय ४०० ते ५०० लोकांना देखील रुबेलच्या मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले आहे, ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. (Shakib Al Hasan)

शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान आहेत. जेव्हा हे आरोप समोर आले तेव्हा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) एक निवेदन जारी केले की शाकिब त्याच्यावरील आरोप सिद्ध होईपर्यंत राष्ट्रीय संघातून खेळत राहील. याच कारणामुळे सध्या सुरु असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून माघारी बोलावण्यात आले नाही. (Shakib Al Hasan)

पण, राजकीय विरोधक म्हणून शकीब विरुद्ध ते कारवाई करू शकतील, असाही अंदाज व्यक्त होत आहे.

(हेही वाचा- Gujarat: भारतीय तटरक्षक दलाच्या ALH हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, ३ क्रू मेंबर बेपत्ता)

पाकिस्तान क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना हरण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि असे झाल्यास बांगलादेश संघ इतिहास रचेल. रावळपिंडीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत असून ही कसोटी जिंकण्यासाठी त्यांना १८५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बांगलादेश संघाने बिनबाद ४२ धावा केल्या असून आता सामना जिंकण्यासाठी आणखी १४३ धावांची गरज आहे, यासोबत पाहुण्या संघाकडे १० गडी शिल्लक आहेत. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही, त्यानंतर चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे लवकर आटोपला. आता एक दिवसाचा खेळ बाकी असून बांगलादेशने सावध फलंदाजी केल्यास विजयासह इतिहास रचला जाईल. (Shakib Al Hasan)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.