Sachin Tendulkar : बोर्डर गावसकर मालिकेत सचिन तेंडुलकर करणार फलंदाजांना मार्गदर्शन?

107
Sachin Tendulkar : बोर्डर गावसकर मालिकेत सचिन तेंडुलकर करणार फलंदाजांना मार्गदर्शन?
Sachin Tendulkar : बोर्डर गावसकर मालिकेत सचिन तेंडुलकर करणार फलंदाजांना मार्गदर्शन?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा माजी सलामीवीर वुर्केरी वेंकट रमणने एका ट्विटर पोस्टने सध्या खळबळ उडवून दिली आहे. भारतीय क्रिकेट वर्तुळात दिवसभर या पोस्टची चर्चा सुरू राहिली. ही सूचना म्हणजे सचिन तेंडुलकरने बोर्डर गावसकर मालिकेसाठी भारताला मार्गदर्शन करावं. त्यासाठी संघाबरोबर ऑस्ट्रेलियाला जावं. त्याने या पोस्टमध्ये तेंडुलकरला तसं जाहीर आवाहनच केलं आहे. सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनामुळे भारतीय संघाला फायदा होईल. त्याचा परिणाम भारतीय संघाच्या कामगिरीतून दिसू शकेल, असं रमणने सूचवलं. आहे. (Sachin Tendulkar)

(हेही वाचा- प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूल बेकायदेशीरपणे सुरू; मनसेचे Sandeep Pachange आक्रमक)

येत्या २२ नोव्हेंबरला भारताची ऑस्ट्रेलियाबरोबरची मालिका सुरू होत आहे. भारतीय सेना पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियन संघाशी दोन हात करेल. बोर्डर – गावसकर चषकाची मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. भारताला निर्विवादपणे अंतिम फेरीत जायचं असेल तर मालिकेतील ५ पैकी ४ कसोटी भारतीय संघाला जिंकाव्या लागतील. न्यूझीलंड विरुद्धची मालिका ०-३ ने गमावल्यामुळे भारतीय संघाचं गणित बिघडलं आहे. (Sachin Tendulkar)

सध्या भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर असला तरी ऑस्ट्रेलियातील आव्हान खडतर आहे. त्यामुळे भारतीय आव्हानही कठीण बनलं आहे. तर विराट कोहलीही कारकीर्दीत एका महत्त्वाच्या वळणावर आहे. या वर्षांत सातत्याने अपयशी ठरलेल्या कोहलीची कारकीर्द आणखी किती लांबू शकेल याचा फैसला या मालिकेत होऊ शकेल. अशावेळी सचिन तेंडुलकर सारखा दिग्गज विराट आणि रोहीतच्या जवळ असेल तर त्याचा भारतीय संघावर सकारात्मक परिणाम होईल, असं रमणला वाटतं.  (Sachin Tendulkar)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.