sachin tendulkar birthday : सचिनला वाढदिवशी वडिलांच्या ‘त्या’ सल्ल्याची झाली आठवण

'सचिन एक उत्तम खेळाडू आहे' या पेक्षा 'सचिन एक उत्तम माणूस आहे', हे ऐकायला त्यांना जास्त आवडेल. वडिलांच्या शब्दाला प्रमाण मानून सचिन आतापर्यंत जगला आहे, यावर दुमत होणार नाही.

34

२४ एप्रिलला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने sachin tendulkar birthday जीवनाचे अर्धशतक पूर्ण केले. कोट्यावधी भारतीयांची मनं जिंकणारा सचिन एक आदर्श खेळाडू आहेच, पण त्यासोबत आदर्श व्यक्ती सुद्धा आहे. “प्लेइंग इट माय वे” या आत्मचरित्रात सचिनने वडिलांचे शब्द लिहिले आहेत. त्याच्या वडिलांनी त्याला लहानपणी सांगितलं होतं, की ‘जर तू नम्र राहिलास तर तुझा खेळ संपल्यावर सुद्धा लोक तुला प्रेम आणि सन्मान देतील.’ ते म्हणाले होते, की ‘सचिन एक उत्तम खेळाडू आहे’ यापेक्षा ‘सचिन एक उत्तम माणूस आहे’, हे ऐकायला त्यांना जास्त आवडेल. वडिलांच्या शब्दाला प्रमाण मानून सचिन आतापर्यंत जगला आहे, यावर दुमत होणार नाही.

सर्वसामान्य माणसांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण सचिनला समाजमाध्यमांवरून भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत. भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सचिनला वेगळ्याच तर्हेने शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देण्याच्या जगावेगळ्या पद्धतीमुळे सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

(हेही वाचा Happy Birthday Sachin : सचिनला दिल्या सेहवागने उलट्या शुभेच्छा! व्हिडिओ होतोय व्हायरल)

काय म्हणाला सेहवाग ..

“मैदानावर तुम्ही जे सांगितलं, नेहमी त्याच्या उलटच केलं आहे. त्यामुळे आज तुमच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त उलटा होऊन शीर्षासन करत तुम्हाला शुभेच्छा देतो आहे. प्रार्थना करतो की तुमचं जीवन असच पुढे चालत राहू दे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! पाजी, एन्जॉय.”

इंस्टाग्रामवर सचिनने भावना व्यक्त केल्या..

सचिनचे इंस्टाग्रामवर जवळपास ४० दशलक्ष फॉलोअर्स आहेत. मागच्या काही वर्षांत या भारतरत्नाने १,१२२ पोस्ट टाकल्या आहेत. ५० व्या वाढदिवसा दिवशी सचिनने विशेष फोटो पोस्ट केले आहेत. त्यात सचिन एका निवांत ठिकाणी हातात चहाचा मग घेऊन स्विमिंग पूलच्या काठावर बसलेला दिसत आहे. या फोटोच्या खाली त्याने मजेशीर कॅप्शन लिहिलं आहे. सचिन लिहितो की “टी टाईम: फिफ्टी नॉट आऊट” नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.