Putin Accuses IOC : रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेवर केला वांशिक भेदभावाचा आरोप

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं रशिया आणि त्यांचा मित्र देश बेलारुसच्या ॲथलीटना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ न देण्याची भूमिका घेतली आहे.

29
Putin Accuses IOC : रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेवर केला वांशिक भेदभावाचा आरोप
Putin Accuses IOC : रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेवर केला वांशिक भेदभावाचा आरोप
  • ऋजुता लुकतुके

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रशिया आणि बेलारुसच्या ॲथलीटना सहभागी होण्यापासून मज्जाव केल्यानंतर रशियन अध्यक्ष पुतिन यांनी ऑलिम्पिक परिषदेवर वांशिक भेदभावाचा आरोप केला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं रशिया आणि त्यांचा मित्र देश बेलारुसच्या ॲथलीटना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ न देण्याची भूमिका घेतली आहे. परिषदेच्या या निर्णयाचा निषेध करताना रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ऑलिम्पिक परिषदेवर वांशिक भेदभावाचा आरोप केला आहे. (Putin Accuses IOC)

पर्ममधील उराल शहरात पत्रकारांशी बोलताना पुतिन म्हणाले की, ‘ऑलिम्पिक परिषदेतील काही डोक्यांना असं वाटतं की, स्पर्धेतील सहभाग हा खेळातील कौशल्यावर अवलंबून नसून तो अधिकार तुमच्या देशातील राज्यकर्त्यांना काही देशांशी चांगले राजकीय संबंध राखल्यामुळे मिळतो.’ खेळांचा वापर खेळातील कौशल्य आजमावण्यासाठी होत नसून तो राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि काही देशांविरुद्ध वांशिक भेदभाव करण्यासाठी होतोय अशी कठोर टीकाही त्यांनी केली. (Putin Accuses IOC)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : वादग्रस्त कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय, पवार-ठाकरेंवर गंभीर आरोप)

आंतरराष्ट्रीय खेळांमधली ही एकाधिकारशाही आहे, असंही पुतिन म्हणाले आणि त्याविरोधात काही खेळांच्या संघटनांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं रशियन ऑलिम्पिक संघटनेची मान्यता रद्द केली आहे. रशियाने युक्रेनमधील संघटनेवर दावा केल्यावरून परिषदेनं ही कारवाई केली. त्याचबरोबर रशियन ॲथलीटना रशियन झेंड्याखाली खेळू न देण्याची भूमिकाही परिषदेनं घेतली होती. अर्थात, ऑलिम्पिक परिषदेचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. पण, त्यापूर्वी रशियाकडून ही अपेक्षित तिखट प्रतिक्रिया आली आहे. (Putin Accuses IOC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.