World Cup 2023 : सामन्यापूर्वी केलेलं रोहितचे ‘ते’ विधान चर्चेत, काय म्हणाला रोहित शर्मा

रोहितने एका वाक्यात न्यूझीलंडचा चांगलाच समाचार घेतला आहे.

22
World Cup 2023 : सामन्यापूर्वी केलेलं रोहितचे 'ते' विधान चर्चेत, काय म्हणाला रोहित शर्मा
World Cup 2023 : सामन्यापूर्वी केलेलं रोहितचे 'ते' विधान चर्चेत, काय म्हणाला रोहित शर्मा

न्यूझीलंडच्या सामन्यापूर्वी आता भारताचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठे विधान केले होते. भारतासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वी रोहितने एका वाक्यात न्यूझीलंडचा चांगलाच समाचार घेतला आहे. (World Cup 2023 )

या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा गोलंदाज मिचेल सँटनरने रोहित शर्माबाबत एक मोठे विधान केले होते. सँटनरने म्हटले होते की, ” भारतीय संघाने आतापर्यंत चार सामेन जिंकले आहेत. या सामन्यांत भारताला अखेरच्या तीन सामन्यांत चांगली साथ मिळाली आहे. भारताला चांगली सुरुवात करून देण्याचे श्रेय हे रोहित शर्माला जात आहे. कारण रोहित शर्मा हा सातत्याने भारताला चांगली सुरुवात करून देत आहे. तर या सामन्याबाबत रोहित म्हणाला की, न्यूझीलंडचा संघ हा किती बलाढ्या आहे, याची कल्पना नक्कीच त्याला आहे. त्यामुळे या सामन्यात सर्व खेळाडूंवर दडपण असेल. पण या दडपणाचा सामना कसा करायचा, ते कसे हाताळायचे हे भारतीय खेळाडूंना माहिती असल्याचे रोहितने सांगितले आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ हा २ बाद १७८ अशा सुस्थितीत होता. त्यावेळी कोणताही कर्णधार हा दडपणाखाली आला असता. पण रोहितबाबत मात्र तसे घडले नाही. रोहितने गोलंदाजांचा चांगला वापर केला आणि त्यामुळे भारताला न्यूझीलंडला २७३ धावांत ऑल आऊट करता आले. रोहित शर्माने आपला संघ या सामन्यात कसा उतरेल, हे स्पष्ट केले होते. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ कसे डावपेच आखतो, हे पाहणे सर्वांत महत्वाचे ठरणार आहे. (World Cup 2023 )

(हेही वाचा :World Cup 2023 :मोहम्मद शामीच्या शानदार गोलंदाजीनंतर, भारतासमोर २७४ धावांचे लक्ष्य)

काय म्हणाला रोहित शर्मा

वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा सामना हा नक्कीच मोठा असेल. त्यामुळे खेळाडूंवर दडपण येऊ शकते. पण या दडपणाचा सामना कसा करायचा हे आता आम्ही शिकलो आहोत. त्यामुळे या सामन्यात आमच्यावर जास्त दडपण नसेल. त्याचबरोबर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्यामुळे मैदानात सामना खेळत असताना आमचे दडपण हलके होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.