Rohit Sharma : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातील एका कसोटीला मुकणार?

145
Rohit Sharma : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातील एका कसोटीला मुकणार?
Rohit Sharma : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातील एका कसोटीला मुकणार?
  • ऋजुता लुकतुके 

२२ नोव्हेंबरपासून भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका सुरू होत आहे. पहिल्या दोन कसोटींपैकी एक कसोटी रोहित शर्मा खेळणार नाहीए. वैयक्तिक कारणामुळे रोहितने माघार घेतली आहे. बीसीसीआयला त्याने कारण कळवलं आहे. २२ तारखेला पर्थला होणारी पहिली कसोटी किंवा ६ डिसेंबरला ॲडलेडला होणारी दिवस – रात्र कसोटी यापैकी एक कसोटी रोहित खेळणार नाही. इतकंच नाही तर रोहितसमोरील घरगुती समस्या मालिकेआधीच दूर झाली तर तो संपूर्ण मालिका खेळेल, असंही समजतंय. (Rohit Sharma)

(हेही वाचा- Vidhansabha Election 2024 : विधानसभेसाठी शरद पवारांनी डाव टाकला; पण उलटणार त्यांच्यावरच ?)

‘नेमकं कारण काय आहे ते कळलेलं नाही. पण, रोहितने बीसीसीआयला ईमेल लिहून परिस्थिती समजावून सांगितली आहे. त्यानुसार तो पहिल्या दोन पैकी एका कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे हे त्याने लेखी कळवलं आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. (Rohit Sharma)

रोहित सध्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेची तयारी मुंबईत राहून करत आहे. १६ ऑक्टोबरपासून ही ३ कसोटींची मालिका सुरू होणार आहे. रोहित जर ऑस्ट्रेलियातील एखादी कसोटी खेळला नाही, तर त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघाबरोबर ठेवलं जाईल, अशी शक्यता आहे. ईश्नरन त्याच सुमारात भारतीय ए संघाबरोबर ऑस्ट्रेलियातच असणार आहे. बीसीसीआय सध्या कसोटी संघासाठी उपकर्णधाराची निवड करत नाही. पण, यंदा उपकर्णधाराची घोषणा संघ निवडीच्या वेळी होऊ शकते. हे स्थान युवा शुभमन गिलला (Shubman Gill) मिळू शकतं. कारण, भावी कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. तसंच जसप्रीत बुमराच्या (Jasprit Bumrah) नावाचीही चर्चा आहे. (Rohit Sharma)

(हेही वाचा- Eng vs Pak, 1st Test Match : इंग्लंडचा ७ बाद ८२३ धावांचा डोंगर, हॅऱी ब्रूक, जो रुट यांचे फलंदाजीचे विक्रम )

येणाऱ्या दिवसांमध्ये याविषयीची स्पष्टता येऊ शकेल.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.