Rishabh Pant : रिषभ पंतला कर वजा जाता २७ कोटींपैकी किती रक्कम मिळणार?

Rishabh Pant : आयपीएलच्या लिलावात रिषभ पंतवर आतापर्यंतची विक्रमी बोली लागली आहे.

135
Rishabh Pant : रिषभ पंतला कर वजा जाता २७ कोटींपैकी किती रक्कम मिळणार?
  • ऋजुता लुकतुके

रिषभ पंतने नुकत्याच सौदी अरेबियात पार पडलेल्या लिलावात विक्रमांची मोडतोड केली. लखनौ सुपरजायंट्सनी त्याच्यावर २७ कोटींची बोली लावून त्याला विकत घेतलं. लीगच्या आतापर्यंतच्या इतिहासातील हा विक्रम आहे. म्हणजेच आगामी ३ हंगामांसाठी रिषभ पंतला (Rishabh Pant) दरवर्षी तब्बल २७ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याची सध्याची फ्रँचाईजी दिल्ली कॅपिटलनेही २०.७५ कोटी रुपयांच्या बोलीवर त्याला आपल्याकडे ठेवण्यासाठी राईट-टू-मॅच कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला. पण, लखनौने किंमत आणखी वाढवली आणि दिल्लीचा नाईलाज झाला.

(हेही वाचा – PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; मुंबईतून महिला ताब्यात)

भरपूर चढाओढीनंतर लखनौने २७ कोटी रुपयांत रिषभला (Rishabh Pant) जिंकलं. २०२२ मध्ये रस्ते अपघातात सुदैवाने वाचलेला रिषभ पंत जेमतेम दीड वर्षांत मैदानात परतला हा ही एक चमत्कार होता. तंदुरुस्ती परत मिळवण्यासाठी रिषभने घेतलेली मेहनत त्यासाठी कारणीभूत होती. तीच सकारात्मकता रिषभ मैदानातही दाखवतो आणि त्यामुळे सगळया संघांना तो हवा होता. रिषभ पंत आता आगामी हंगामात लखनौ सुपरजायंट्सचं नेतृत्वही करणार आहे.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या फॉर्मची चर्चा करताना गावसकरांनी विराटची तुलना केली नदाल, फेडरर आणि जोकोविचशी…)

लखनौ संघाने रिषभला (Rishabh Pant) २७ कोटी रुपये देण्याचं मान्य केलं असलं तरी त्यावर बसणारा करही तसाच चढा आहे. त्यामुळे रिषभच्या हातात अख्खी रक्कम पडणार नाही. तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्हाला सरकारला प्राप्तीकर भरायचा असतो. आणि तुमची कंपनी उत्पन्नाच्या स्त्रोतावरच उत्पन्नाच्या मर्यादेनुसार, टीडीएस वजावट आकारत असते. याला स्त्रोतावर लागणारा आयकर असं म्हटलं जातं. टीडीएस वजावट ही उत्पन्नाच्या मर्यादेनुसार, १० टक्के, २० टक्के किंवा ३० टक्के अशी असते. रिषभचं उत्पन्न उच्च उ्त्पन्न गटातील असल्यामुळे त्याच्या २७ कोटींमधून ८.१ कोटी रुपये कापले जातील. हे पैसे थेट फ्रँचाईजीकडून प्राप्तीकर विभागाकडे जमा होतील आणि त्यानंतर आयकर विवरणपत्र भरताना रिषभला प्रत्यक्ष मिळकत आणि त्यानुसार, प्राप्तीकर भरावा लागेल.

करारातील रक्कम – दरवर्षी २७ कोटी रु.

प्राप्तीकर – ८.१ कोटी रु

ठोस उत्पन्न – १८.९ कोटी रु

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.