Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाला खुणावत आहेत कसोटींतील ‘हे’ विक्रम 

Ravindra Jadeja : आणखी ६ बळींनंतर जाडेजा कसोटीत एका नवीन विक्रमाला गवसणी घालणार आहे 

106
Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाला खुणावत आहेत कसोटींतील ‘हे’ विक्रम 
Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाला खुणावत आहेत कसोटींतील ‘हे’ विक्रम 
  • ऋजुता लुकतुके 

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) कसोटी क्रिकेटमध्ये एका नवीन विक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहेत. आणखी ६ बळी मिळवले की तो जगातील अव्वल १० अष्टपैलू खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसेल. ही माळ असेल कसोटीत ३०० बळी आणि ३,००० धावा करणाऱ्या १० मोजक्या अष्टपैलू खेळाडूंची. यापूर्वी भारताकडून कपिल देव (Kapil Dev) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी तशी कामगिरी केली आहे. जडेजा आतापर्यंत ७२ कसोटी खेळला आहे. यात त्याने ३,०३६ धावा आणि २९४ बळी मिळवले आहेत.

कपिल देव (Kapil Dev) आपल्या कारकीर्दीत १३१ कसोटी खेळला. यात त्याने ३३४ बळींसह ५,२४८ धावा केल्या. तर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आताही जडेजाचा संघातील फिरकी साथीदार आहे. त्याच्या खात्यात १०० कसोटींमध्ये ५१५ बळी आणि ३,३३४ धावा जमा आहेत. जागतिक स्तरावर अशी कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंमध्ये दिग्गज नावं आहेत. (Ravindra Jadeja)

(हेही वाचा- Cabin Crew Salary : विमानातील हवाई सुंदरी, सेवक, पर्सर यांना किती पगार असतो?)

शेन वॉर्नने आपल्या कारकीर्दीत ७०८ बळी मिळवले. ३,१५४ धावाही केल्या. तर इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने १६७ कसोटींमध्ये ६०४ बळी आणि ३,६६२ धावा केल्या आहेत. इंग्लंडचाच इयॉन बॉथम हा कपिल देवच्या काळातील क्रिकेटपटू या यादीत आहे. त्याने १०२ कसोटींत ३८३ बळी आणि ५,००२ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडली यांनी ८८ कसोटींत ४३१ बळी आणि ३,१३४ धावा केल्या.  (Ravindra Jadeja)

न्यूझीलंडचा फिरकीपटू डॅनिएल व्हिटोरीनेही ११३ कसोटींत ३६४ बळी आणि ४,५३१ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून शॉन पोलॉक १०८ कसोटी खेळला. यात त्याने ३,७८१ धावा आणि ४२१ बळी मिळवले. पाकिस्तानच्या इमरान खाननेही ८८ कसोटींत ३६२ बळी आणि ३,८०७ धावा केल्या. श्रीलंकेचा चामिंडा वासही या यादीत आहे. त्याने १११ कसोटींत ३,००८ धावा तसंच ३५७ बळी मिळवले आहेत. (Ravindra Jadeja)

(हेही वाचा- Maharashtra च्या राजकारणात महिला मुख्यमंत्री होण्याची मागणी या निवडणुकीत होणार पूर्ण?)

रवींद्र जडेजा सध्या ३५ वर्षांचा आहे. टी-२० विश्वचषक विजेतेपदानंतर त्याने टी-२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारली आहे. भारतीय संघाला या हंगामात १० कसोटी खेळायच्या आहेत. यातील ५ कसोटी भारतात होणार आहेत. त्यामुळे या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी जडेजाकडे आहे.  (Ravindra Jadeja)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.