Ravichandran Ashwin : अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा ‘हा’ विक्रम

Ravichandran Ashwin : अश्विन आशियाई उपखंडात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे 

125
Ravichandran Ashwin : अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा ‘हा’ विक्रम
Ravichandran Ashwin : अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा ‘हा’ विक्रम
  • ऋजुता लुकतुके 

भारताचा ज्येष्ठ फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आता आशियातील सगळ्यात यशस्वी भारतीय गोलंदाज बनला आहे. याबाबतीत त्याने अनिल कुंबळेला (Anil Kumble) मागे टाकलं आहे. शुक्रवारी त्याने आशिया खंडातील आपला ४२० वा बळी मिळवला. तिथेच अनिल कुंबळेच्या ४१९ बळींच्या विक्रमाला मागे टाकलं. कसोटी क्रिकेटमध्ये खासकरून भारतीय वातावरणात अश्विनने यापूर्वी अनेक कसोटी गाजवल्या आहेत. त्या जोरावर १०२ कसोटींत ५२३ बळी आपल्या नावावर केले आहेत.

(हेही वाचा- Ujjain Mahakal Temple: महाकाल मंदिरातील भिंत कोसळली! दोघांचा मृत्यू, दोन जखमी)

आशियातील खेळपट्ट्या या फिरकीला पोषक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे इथे त्याची कामगिरी जास्त उजवी आहे. आताही आशियात ४२० बळी घेऊन तो दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. श्रीलंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या (Muttiah Muralitharan) खालोखाल आशियात यशस्वी झालेला गोलंदाज अश्विन असेल. मुरलीधरन हा श्रीलंकेचा आणि जागतिक स्तरावरही सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी मिळवण्याचा भीम पराक्रम केला आहे. त्यामुळे त्याच्या विक्रमाला हात लावू शकेल असा एकही गोलंदाज सध्या क्रिकेटमध्ये नाही. पण, अश्विनने त्याच्या खालोखाल जागा आशियात मिळवली आहे. रंगना हेराथ आणि हरभजन सिंग हे आणखी दोन खेळाडू आहेत ज्यांनी आशियात ३०० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. (Ravichandran Ashwin)

(हेही वाचा- Thane Borivali Tunnel : ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त १२ मिनिटांतच! ‘असा’ असेल जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग)

आशियात सर्वाधिक बळी मिळवणारे गोलंदाज 

मुथय्या मुरलीधरन – ६१२

रवीचंद्रन अश्विन – ४२०

अनिल कुंबळे – ४१९

रंगना हेराथ – ३५४

हरभजन सिंग – ३००

 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.