Rahul Dravid : रोहित, विराटबरोबर राहुल द्रविडचा सराव

Rahul Dravid : रोहीत, विराट न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेची तयारी करत आहेत 

196
Rahul Dravid : रोहित, विराटबरोबर राहुल द्रविडचा सराव
Rahul Dravid : रोहित, विराटबरोबर राहुल द्रविडचा सराव
  • ऋजुता लुकतुके 

भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) रविवारी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma)बरोबर पुन्हा एकदा सराव करताना दिसले. भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना १६ ऑक्टोबरपासून बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर (Chinnaswamy Stadium) रंगणार आहे. रोहित आणि विराट तिथेच सराव करत आहेत. त्यावेळी राहुल द्रविड यांनी रविवारी तिथे हजेरी लावली. राहुल द्रविड जून २०२४ पर्यंत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. अडीच वर्षं ते भारतीय संघाबरोबर होते. त्यामुळे त्यांचे आणि भारतीय खेळाडूंबरोबरचे संबंध छान आहेत.

(हेही वाचा- मानवाला चंद्र आणि मंगळावर घेऊन जाणाऱ्या SpaceX च्या पाचव्या स्टारशिपची चाचणी यशस्वी)

आताही विराट, रोहित, रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्याबरोबर त्यांनी काही वेळ घालवला. फलंदाजीचा सरावही केला. (Rahul Dravid)

 १६ ऑक्टोबरच्या पहिल्या कसोटीनंतर दुसरी कसोटी २४ ऑक्टोबरपासून पुण्यात सुरू होणार आहे. तर १ नोव्हेंबरपासून तिसरी कसोटी मुंबईत सुरू होणार आहे. भारतीय संघासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. ती जिंकून भारतीय संघ आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपलं स्थान भक्कम करू शकेल. शिवाय आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय खेळाडूंना सरावाची ही शेवटची संधी असेल. (Rahul Dravid)

(हेही वाचा- CM Shinde यांची मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा; मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी)

दसरीकडे, न्यूझीलंडचा संघ नवीन कर्णधार टॉम लिथमच्यानेतृत्वाखाली या मालिकेची तयारी करत आहे. टीम साऊदीने अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर राजीनामा दिला होता.आता टीम लिथमकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. भारतीय नेतृत्वाच्या फळीतही एक बदल आहे. रोहित शर्माच्या हाताखाली उपकर्णधार म्हणून जसप्रीत बुमराची (Jasprit Bumrah) निवड करण्यात आलीय. एरवी भारतातील मालिकेत निवड समिती उपकर्णधाराची निवड करत नाही. पण, या निवडीतून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही निवड समितीने संदेश दिला आहे. (Rahul Dravid)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.