Rahul Dravid : राहुल द्रविड पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक

77
Rahul Dravid : राहुल द्रविड पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक
Rahul Dravid : राहुल द्रविड पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) पुन्हा एकदा आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. टी-२० विश्चषकात भारतीय संघाला द्रविडच्या मार्गदर्शनाखालीच विजेतेपद मिळालं होतं. आणि साडेतीन वर्षं भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर द्रविड जून महिन्यातच या जबाबदारीतून मुक्त झाला आहे.

आणि क्रिकइन्फो वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, द्रविडला (Rahul Dravid) आयपीएल २०२५ पूर्वी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या आयपीएल फ्रँचाईजीने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. द्रविडचं या संघाशी जुनं नातं आहे. आयपीएल कारकिर्दीत तो राजस्थानचा कर्णधार होता. यानंतर तो संघाचा मार्गदर्शकही बनला.

(हेही वाचा – Rich Indian Cricketers : कुठला भारतीय क्रिकेटपटू भरतो सर्वाधिक आयकर?)

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, राजस्थानने द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आणि दोघांमध्ये तसा करारही झाला आहे. मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर द्रविड मेगा लिलावादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याचे संघाशी खूप चांगले संबंध आहेत.

(हेही वाचा – Mumbai Crime शाखेची कौतुकास्पद कारवाई, ड्रग्स माफियांना अटक करून काढली वरात)

द्रविडची आयपीएल कारकीर्द चमकदार राहिली आहे. आयपीएल २०१२ आणि २०१३ मध्ये तो राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार होता. यानंतरही तो आणखी दोन वर्षे संघाशी जोडला गेला. द्रविड २०१४ आणि २०१५ मध्ये संघाचा मार्गदर्शक आणि संचालक होता. त्यानंतर २०१६ मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये सामील झाला. यानंतर द्रविडने भारतीय क्रिकेट संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

द्रविड (Rahul Dravid) आयपीएल संघांनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेला होता. २०१९ मध्ये तो अकादमीचा प्रमुख झाला. यानंतर २०१२१ मध्ये त्याला भारतीय संघाचं मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं. द्रविडच्या कोचिंगमध्ये भारताने २०२४ चा टी-20 विश्वचषकही जिंकला आहे.कुमार संगकारा राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक आहे. आता द्रविडही संघाचा एक भाग झाला आहे. त्यांच्यासोबत विक्रम राठोड यांनाही महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. राठोड यांना सहाय्यक प्रशिक्षक करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार त्यांनी करारावर स्वाक्षरीही केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.