Champions Trophy 2025 : पाक क्रिकेट मंडळाने हायब्रीड मॉडेलचा पर्याय नाकारला?

Champions Trophy 2025 : पीसीबीचे अध्यक्ष नकवी यांनी मीडियाला एक स्फोटक मुलाखत दिली आहे.

73
Champions Trophy 2024 : चॅम्पियन्स करंडकाचा घोळ अजूनही सुरूच, आयसीसी बैठक निर्णयाविनाच संपली
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी संपूर्ण चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानातच होणार आणि मंडळाला हायब्रीड मॉडेल मान्य नसल्याची भूमिका अलीकडे एका मुलाखतीत मांडली आहे. भारताला काही समस्या असतील तर त्यांनी पाक मंडळाशी थेट संपर्क साधावा असं म्हणायलाही ते विसरले नाहीत. लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमबाहेर एक जाहीर पत्रकार परिषद घेताना नकवी यांचा आवाज ताठर होता. (Champions Trophy 2025)

‘पाकिस्तानचा अभिमान आणि सन्मान आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे हायब्रीड मॉडेल स्वीकारणार नाही, यावर आम्ही ठाम आहोत. भारताला काही समस्या असतील तर त्यांनी आमच्याशी थेट संपर्क करावा. आम्ही आमचं म्हणणं आयसीसीला कळवलं आहे. आयसीसीकडून स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होण्याची वाट बघत आहोत,’ असं नकवी या परिषदेत म्हणाले. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Air India: ऐकावं ते नवल! ड्युटी संपली म्हणुन International flight Jaipur मध्ये सोडून पायलट गेले निघून)

उलट नकवी यांनी आयसीसीवरही पलटवार केला आहे. ‘आयसीसी ही क्रिकेट नियामक संस्था आहे. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाचं प्रतिनिधित्व त्यांनी करावं. एकाच देशाची सत्ता मान्य करू नये,’ असंही नकवी यांनी आयसीसीला ठणकावलं आहे. ‘आयसीसीने आता पुढाकार घ्यायला पाहिजे. भारतीय संघाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही वेळापत्रकात एकदा बदल केला आहे. चॅम्पियन्स करंडकासाठी पात्र ठरलेला इतर प्रत्येक देश पाकिस्तानमध्ये येण्यासाठी तयार आहे. आता आयसीसीनेही स्पर्धा ठरल्यासारखी पार पडावी यासाठी सहकार्य करावं,’ असं नकवी म्हणाले. (Champions Trophy 2025)

इतकंच नाही तर क्रिकेट आणि राजकारण यांची सरमिसळ करू नये अशी कोपरखळीही त्यांनी भारताला मारली. अर्थात, चॅम्पियन्स करंडकाचं आताचं स्टेटस पहिलं तर अनिश्चितता अजूनही कायम आहे. भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यासाठी नकार दिला आहे. स्पर्धा कशी पार पडणार यावर स्पष्टता नसल्यामुळे आयसीसीने अजूनही स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.