Paris Paralympic : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हरविंदर सिंगला ऐतिहासिक सुवर्ण

तिरंदाजीत हरविंदरने देशासाठी पहिलं ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिक सुवर्ण मिळवलं आहे.

83
Paris Paralympic : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हरविंदर सिंगला ऐतिहासिक सुवर्ण
Paris Paralympic : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हरविंदर सिंगला ऐतिहासिक सुवर्ण
  • ऋजुता लुकतुके

३३ वर्षीय हरविंदर सिंगने (Harvinder Singh) पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये (Paris Paralympic) इतिहास रचताना भारतासाठी पहिलं तिरंदाजीतील सुवर्ण जिंकलं आहे. अंतिम फेरीत त्याने पोलंडच्या ल्युकास सिसझेकला ६-० असं हरवलं. २८-२४, २८-२७ आणि २९-२५ असे सहा सेट पार पडले. हरविंदर सध्या अर्थशास्त्रात डॉक्टरेट करत आहे. आणि तीन वर्षांपूर्वी टोकयो ऑलिम्पिकमध्ये त्याने कांस्य जिंकलं होतं. पण, आता दोन पावलं पुढे जात त्याने तिरंदाजीत देशासाठी ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकमधील पहिलं सुवर्ण जिंकलं आहे.

शिवाय त्याच्या आणि धरमिंदरच्या क्यू थ्रोमधील सुवर्णांमुळे आता भारताची पॅरालिम्पिकमध्ये (Paris Paralympic) सुवर्ण पदकांची संख्याही ५ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) हरविंदरचं ट्विटर संदेशातून अभिनंदन केलं आहे.

(हेही वाचा – पुढील वर्षभराची वीज आणि पाण्याची चिंता दूर; Koyna Dam काठोकाठ भरले)

‘हे पदक खास आहे. कारण, तिरंदाजीतील हे पहिलं पॅरालिम्पिक (Paris Paralympic) सुवर्ण आहे. अचूकता, आणि खेळाप्रती प्रेम यामुळे हरविंदरचं हे पदक शक्य झालं आहे. पदकासाठी त्याचं अभिनंदन,’ असं पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या संदेशात म्हटलं आहे. खासकरून हरविंदरला एकामागून एक सामने बुधवारी खेळावे लागले. आणि अंतिम सामना रात्री उशिरा झाला. त्यामुळे थकव्याशी सामना करत त्याने हे पदक जिंकलं. लहानपणीच डेंग्यूवर उपचार घेताना त्याचे दोन्ही पाय अधू झाले. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं त्याच्यासाठी थकवणारं आहे. ते पाहता एकाच दिवशी तीन सामने खेळण्याचा ताण मोठा होता.

(हेही वाचा – Nagpur Goa Shaktipeeth expressway: महायुती सरकारच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक!)

यंदाच्या पॅरालिम्पिक (Paris Paralympic) खेळांतील भारताचं हे तिरंदाजीतील दुसरं पदक आहे. यापूर्वी शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी मिश्र सांघिक स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारात कांस्य जिंकलं होतं. गरविंदर उपान्त्य सामन्यात इराणच्या मोहम्मद रझाविरुद्ध १-३ असा मागे होता. तिथून बाजी पलटवून त्याने अंतिम फेरीत जागा मिळवली. आणि त्यानंतर ऐतिहासिक सुवर्ण त्याने जिंकलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.