Paris Olympic 2024 : लक्ष्य सेनची आता लढत कांस्य पदकासाठी; लवलिनाचं पदक हुकलं

Paris Olympic 2024 : लक्ष्य सेनकडे ३ गेम पॉइंट असताना आणि ७-० अशी आघाडी असताना त्याचा पराभव झाला

155
Paris Olympic 2024 : लक्ष्य सेनची आता लढत कांस्य पदकासाठी; लवलिनाचं पदक हुकलं
Paris Olympic 2024 : लक्ष्य सेनची आता लढत कांस्य पदकासाठी; लवलिनाचं पदक हुकलं
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिक स्पर्धेचा दर्जा आणि स्पर्धा इतकी मोठी आहे की, इथं जिंकण्यासाठी तुमचा फॉर्मही अपुरा ठरतो. भल्या भल्यांची स्वप्न इथं जमीनदोस्त होतात. भारताचा २२ वर्षीय आणि क्रमवारीतही २२ व्या स्थानावर असलेल्या लक्ष्य सेनलाही (Lakshya Sen) रविवारी ऑलिम्पिकमधील आव्हानाचा अनुभव आला. पहिल्या गेममध्ये २०-१७ आणि दुसऱ्या गेममध्ये ७-० अशी आघाडी असताना द्वितीय मानांकित व्हिक्टर एक्सेलसनकडून त्याचा २०-२२ आणि १४-२१ असा पराभव झाला. अर्थात, हा उपांत्य फेरीचा सामना असल्यामुळे लक्ष्यला सोमवारी कांस्य पदकाची संधी मिळणार आहे. त्यासाठी त्याचा मुकाबला मलेशियाच्या ली झि झिनशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता हा सामना होईल. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Ind vs SL, 2nd ODI : श्रीलंकेची भारतावर ३२ धावांनी मात; टी-२० विश्वचषकानंतर भारताचा पहिली पराभव )

लक्ष्यने दोन्ही गेममध्ये सुरुवात दणदणीत केली होती. सुरुवातीला त्याच्यावर दडपणही दिसत नव्हतं. त्याच्याकडे १४-८ अशी आघाडी पहिल्या गेममध्ये होती. ती त्याने २०-१७ पर्यंत नेली. पण, ३ गेमपॉइंट असताना एक्सेलसनने खेळ उंचावत हा गेम घेतला. दुसऱ्या गेममध्ये तर त्याने ०-७ ची पिछाडी भरून काढत लक्ष्यला हरवलं. एक्सेलसनच्या जोरकस फटक्यांबरोबरच दड़पणानेही लक्ष्यचा बळी घेतला. (Paris Olympic 2024)

 दुसरीकडे भारताची अव्वल मुष्टीयोद्धा आणि टोकयो ऑलिम्पिकमधील कांस्य पदकविजेती लवलीना बोरगोहेनलाही (Lovlina Borgohain) उपउपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तिचं पदकही हुकलं. ७५ किलो गटात चीनच्या ली कियानने तिला ४-१ ने हरवलं. ली कियानला टोकयो ऑलिम्पिकमध्येही रौप्य पदक मिळालं होतं. इथंही ती लवलिनापेक्षा सरस ठरली. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- श्रावणातील पहिल्याच सोमवारी Omkareshwar Mandir पाण्याखाली, भाविक दर्शनाला मुकणार?)

लवलिनने सामन्यात आक्रमक धोरण ठेवलं होतं. तर ली कियान संतुलित होती. तिने मोजकेच पण अचूक फटके मारण्यावर भर दिला. त्यामुळे पहिल्या फेरीतच लवलिन (Lovlina Borgohain) कोंडीत सापडली होती. त्यातच कियानच्या तांत्रिक सफाईने तिला जेरीला आणलं. अखेर लवलिनचा पराभव झाला. यंदा एकाही भारतीय मुष्टियोद्धयाला ऑलिम्पिक पदक मिळवता आलं नाही. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.