Paris Olympic 2024 : अविनाश साबळेचं पदकाचं स्वप्न हुकलं

Paris Olympic 2024 : ३००० मीटर स्टिपलचेजच्या अंतिम फेरीत अविनाश अकरावा.

115
Paris Olympic 2024 : अविनाश साबळेचं पदकाचं स्वप्न हुकलं
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मराठमोठा ॲथलीट अविनाथ साबळेला ३,००० मीटर स्टिपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत अकराव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय असला तरी त्याचं पदक हुकलं आहे. ३,००० मीटरच्या अंतरासाठी अविनाशने ८ मिनिटं आणि १४.१८ सेकंदांची वेळ दिली. ३,००० मीटर स्टिपलचेसमध्ये अविनाश अकरावा आला. भारतीय स्टार खेळाडूनं ८:१४:१८ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. सुवर्ण जिंकणाऱ्या मोरोक्कोच्या सुफयान अल बकलीपेक्षा अविनाश ८ सेकंद मागे होता. (Paris Olympic 2024)

२९ वर्षीय भारतीय ॲथलीट अविनाश साबळेनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देत सोमवारी इतिहास रचला होता. पण, अंतिम स्पर्धेत अकराव्या स्थानावर राहिला आणि त्याचं पदक हुकलं. दरम्यान, या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो भारतातील पहिला खेळाडू आहे. राष्ट्रीय विक्रम धारक साबळेनं दुसऱ्या हीटमध्ये ८ मिनिटं १५.४३ च्या वेळेसह पाचवं स्थान पटकावलं होतं. तीन हीटमध्ये अव्वल पाच धावपटूंना फायनलची तिकिटं मिळाली. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : अंतिम पंघालवर शिस्तभंगाची कारवाई, तातडीने भारतात पाठवणार)

अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा. त्याच्या याच सरावामुळे २००५ मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांनं पहिला नंबर पटकावला होता. अविनाशनं त्यानंतर धावण्याच्या स्पर्धेमध्ये यशाचं एक-एक शिखर सर केलं आणि त्यासाठी त्याला त्याच्या कुटुंबाची देखील मोलाची साथ मिळाली. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी आणि सरावासाठी वेळप्रसंगी व्याजानं पैसे काढले आणि त्याचं शिक्षण आणि सराव चालू ठेवला. लष्करामध्ये अविनाशला नोकरी लागली, तरीही त्यातला खेळाडू शांत बसाला नाही, त्यानं आपली जिद्द सोडली नाही. अविनाशला पदक मिळवता आलं नसलं तरी त्यानं मनं नक्कीच जिंकली आहेत. ऑलिम्पिकच्या फायनल्ससाठी पात्र ठरणारा हा पहिला खेळाडू ठरला. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.