Paris Olympics 2024 : ऑलिम्पिक पदकाचा रंग एका आठवड्यात उतरला! खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल?

130

पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पदकांचा रंग हरवत चालला आहे. ब्रिटनची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती यास्मिन हार्परने (Yasmin Harper) दावा केला आहे की तिच्या पदकाचा रंग निघत चालला आहे. महिलांच्या 100 मीटर सिंक्रोनाइझ स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत तिला हे पदक मिळाले.

(हेही वाचा –Neeraj Chopra Future Plans : पॅरिसमधील रौप्य पदकानंतर नीरजला पुढे ‘हे’ करायचंय!)

अमेरिकेच्या स्केटबोर्ड टीमच्या सदस्यानेही अशीच तक्रार केली आहे. आपल्या कांस्यपदकाचा रंग मंदावला होता आणि तो मागच्या बाजूलाही तुटल्याचे त्याने सांगितले. पदके हे खेळाडूंच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे प्रतीक आहेत. अशा स्थितीत खराब पदक मिळणे निराशाजनक आहे. या प्रकरणामुळे पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. (Paris Olympics 2024)

(हेही वाचा –Neeraj Chopra Future Plans : पॅरिसमधील रौप्य पदकानंतर नीरजला पुढे ‘हे’ करायचंय!)

“हे थोडं निराशाजनक आहे, कारण ते (पदक) फक्त एक आठवडा चमकत होतं,” असं यास्मिन हार्पर म्हणाली. मात्र हे कांस्यपदक असून त्याचं स्वत:चं महत्त्व असल्यानं यामुळे मला फारसा फरक पडला नसल्याचंही तिनं सांगितलं. दुसरीकडे अमेरिकन ॲथलीटनं सांगितलं की, त्याचं कांस्यपदक मागच्या बाजूला तुटलं आहे आणि हळूहळू त्याचा रंग चालला आहे. (Paris Olympics 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.