Noel Tata : नोएल टाटाच रतन टाटांचे उत्तराधिकारी; टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नेमणूक 

Noel Tata : ६७ वर्षीय नोएल टाटा हे रतन टाटांचे सावत्र भाऊ आहेत

189
Noel Tata : नोएल टाटाच रतन टाटांचे उत्तराधिकारी; टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नेमणूक 
Noel Tata : नोएल टाटाच रतन टाटांचे उत्तराधिकारी; टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नेमणूक 
  • ऋजुता लुकतुके 

अखेर अपेक्षेप्रमाणेच रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटाच (Noel Tata) त्यांचे उत्तराधिकारी ठरले आहेत. दोराबजी टाटा आणि रतन टाटा ट्रस्ट या दोन महत्त्वाच्या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून रतन टाटांनंतर नोएल यांचीच नेमणूक झाली आहे. या दोन ट्रस्टकडेच टाटा सन्स कंपनीची ६६ टक्के भागिदारी आहे. नवल आणि सिमॉन टाटा यांचा मुलगा असलेले नोएल गेली ४ दशकं टाटा समुहाशी जोडलेले आहेत. आणि सध्या ते टाटा इंटरनॅशनल्स लिमिटेड या कंपनीचा कारभार पाहतात.

(हेही वाचा- “मी पुन्हा सत्तेत आलो तर भारतावर…”, Donald Trump यांनी काय दिला इशारा?)

नोएल यांनी पदवी अभ्यासक्रम ससेक्स विदयापीठातून पूर्ण केला आहे. त्यानंतर इंटरनॅशनल एक्झिकिटिव्ह प्रोग्राम त्यांनी फ्रान्समधून पूर्ण केला आहे. जून १९९९ मध्ये नोएल त्यांची आई सिमॉन डीनोएर यांच्याबरोबर त्यांनी टाटाच्या ट्रेंट या कंपनीचा कारभार पाहायला सुरुवात केली. ट्रेंट कंपनी वेस्टसाईड हा फॅशन ब्रँड चालवते. नोएल यांच्याच नेतृत्वाखाली वेस्टसाईडने आघाडीचा फॅशन ब्रँड म्हणून प्रगती केली. (Noel Tata)

२००३ मध्ये नोएल यांनी टायटन आणि वोल्टास या टाटा आणखी काही ब्रँडचा कारभार हाती घेतला. तर २०१४ मध्ये नोएल ट्रेंट लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष झाले. (Noel Tata)

(हेही वाचा- शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये Center of Excellence संदर्भात सामंजस्य करार)

२०१९ मध्ये नोएल यांनी रतन टाटा ट्रस्टमध्ये प्रवेश केला. तेव्हाच त्यांना रतन टाटा यांचे वारसदार म्हटलं गेलं होतं. कारण, रतन टाटांनीच त्यांच्यावर ही जबाबदारी टाकत विश्वास दाखवला होता. तोपर्यंत २०१८ मध्ये ते टायटन कंपनीचे उपाध्यक्ष झाले होते. तर २०२२ मध्ये ते टाटा स्टीलचे उपाध्यक्ष झाले. २०१९ नंतर त्यांच्या वरील जबाबदाऱ्या वाढत गेल्या. २०१० ते २०२१ या कालावधीत नोएल टाटा इंटरनॅशनल्सचे अध्यक्ष असताना कंपनीचा महसूल ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलरवरून ३ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता.  (Noel Tata)

नोएल टाटा हे टाटा समुहातील अनेक नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक मंडळात आहेत. त्यांना तीन मुलं आहेत. नेव्हिल, माया आणि लीह ही त्यांची तीनही मुलं टाटाच्या ट्रस्टचे सदस्य आहेत. शिवाय नोएल यांचं लग्न आलू मिस्त्री यांच्याशी झालं आहे. त्या टाटाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या बहीण आहेत. शापूरजी पालनजी समुहातील पालनजी यांच्या मुलगी आहेत. या कुटुंबाकडे टाटा सन्सचे सर्वाधिक समभाग आहेत. त्यामुळे नोएल कुटुंबीयांकडेही टाटा सन्सचे सर्वाधिक समभाग आहेत. ते पाहता नोएल यांची टाटा ट्रस्टच्या अघ्यक्षपदी निवड अपेक्षितच मानली जात होती. (Noel Tata)

(हेही वाचा- “हिंदूंनी संघटित आणि मजबूत…”, बांग्लादेशातील हिंसाचारावर सरसंघचालक Mohan Bhagwat नेमकं काय म्हणाले?)

रतन टाटांच्या तुलनेत नोएल टाटा हे लोक आणि मीडियापासून दूर राहणारे आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांनाही त्यांची उपस्थिती विरळाच दिसते. पण, टाटा समुहात ते चांगलेच सक्रिय आहेत. नोएल आणि रतन टाटा हे टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू आहेत. जमशेदजींनीच आपल्या निधनावेळी टाटा ट्रस्टची स्थापना केली होती. समुहातील कंपन्यांची ६० टक्के मालकी त्यांनी या ट्रस्टकडे सोपवली.  (Noel Tata)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.