Neeraj Chopra Silver : नीरज चोप्राच्या पाठीवर पंतप्रधान मोदींची कौतुकाची थाप 

Neeraj Chopra Silver : नीरजचं हे सलग दुसरं ऑलिम्पिक पदक आहे 

94
Neeraj Chopra Silver : नीरज चोप्राच्या पाठीवर पंतप्रधान मोदींची कौतुकाची थाप 
Neeraj Chopra Silver : नीरज चोप्राच्या पाठीवर पंतप्रधान मोदींची कौतुकाची थाप 
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काही निकाल भारताच्या विरोधात जात असताना भालाफेकपटू नीरज चोप्रा मात्र आपल्या लौकिकाला जागला आणि अंतिम फेरीत या हंगामातील आपली सर्वोत्तम फेक साध्य करत त्याने ८९.४५ मीटरच्या फेकीसह रौप्य पदक आपल्या नावावर केलं. पाकिस्तानचा अर्शद नदीम ९२.९७ मीटरच्या फेकीसह सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. त्याने नवीन ऑलिम्पिक विक्रमही रचला. या कामगिरीनंतर २६ वर्षीय नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नीरजसाठी एक सुरेख संदेश लिहून त्याचं कौतुक केलं आहे. (Neeraj Chopra Silver)

(हेही वाचा- Neeraj Chopra Silver : नीरजचं सुवर्ण हुकलं, सलग २ ऑलिम्पिकमध्ये पदकांचा विक्रम )

‘श्रेष्ठतेचं दुसरं नाव नीरज चोप्रा आहे. आपल्या कौशल्याची चुणूक दरवेळी तो दाखवून देतो. सलग दुसऱ्यांदा मिळवलेल्या ऑलिम्पिक पदकामुळे अख्खा भारत आनंदी झाला आहे. ऑलिम्पिक रौप्य पदकासाठी त्याचं अभिनंदन. ऑलिम्पिक विजेतेपदाचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुण भारतीयांना तो प्रेरणादायी आहे,’ असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात लिहिलं आहे. (Neeraj Chopra Silver)

 सर्वच क्षेत्रातून नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या रौप्य पदकामुळे नीरज चोप्रा दोन ऑलिम्पिक पदकं मिळवणाऱ्या पी व्ही सिंधू (PV Sindhu) (रौप्य व कांस्य), सुशील कुमार (Sushil Kumar) (कांस्य व रौप्य), मनू भाकर (Manu bhakerManu bhaker) (२ कांस्य) या खेळाडू्च्या पंक्तीत बसला आहे. (Neeraj Chopra Silver)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.