Neeraj Chopra : डायमंड्स लीगमध्ये नीरज चोप्राची रौप्य पदकाला गवसणी

Neeraj Chopra : ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९१.६१ मीटरवर भालाफेक करत पटकावलं सुवर्ण 

91
Neeraj Chopra : स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावलेल्या भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड्स लीगमध्येही कामगिरीतील सातत्य कायम ठेवलं आहे. इथं ऑलिम्पिकमधील कामगिरी थोडी सुधारून त्याने ८९.४९ मीटरची भालाफेक केली. आणि डायमंड्स लीग या प्रतीष्ठेच्या स्पर्धेतही त्याच्या नावावर रौप्य लागलं. अर्थात, सुवर्ण मिळवणाऱ्या ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.६१ अंतरावर भाला फेकला. आणि नीरजला अजूनही ९० मीटरचं लक्ष्य गाठता आलेलं नाही. पण, दुखापतग्रस्त असलेला नीरज कामगिरीत सातत्य राखून आहे.

(हेही वाचा- Shiv Sena UBT ची मुख्यमंत्री पदावरून चिडचीड उघड)

पहिल्या प्रयत्नात केवळ ८२.१० मीटर भालाफेक करू शकला. दुसऱ्या फेकीत त्याने अधिक चांगले अंतर कापले आणि ८३.२१ मीटर अंतरावर भालाफेक केली. पाचव्या थ्रोपर्यंत, त्याचा सर्वोत्तम थ्रो केवळ ८३.२१ मीटर राहिला. सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात नीरज चोप्राने ८९.४९ मीटरचे अंतर मोजले. हा नीरज चोप्राची हंगामातील सर्वोत्तम फेक आहे,  कारण याआधी त्याची सर्वोत्तम फेक २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) झाला होता, जिथे त्याने ८९.४५ मीटर अंतरावर भाला फेकला होता. (Neeraj Chopra)

 डायमंड लीगबद्दल सांगायचे तर डायमंड लीग वर्षातून चार ठिकाणी आयोजित केली जाते. यंदा ही लीग दोहा, पॅरिस, ल्युसान आणि शेवटी झुरिच इथं होणार आहे. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये ८८.३६ मीटर भालाफेक करून दुसरा क्रमांक पटकावला. पण २०२४ च्या ऑलिम्पिकपूर्वी त्याने पॅरिस डायमंड लीगमध्ये फिटनेसच्या कारणास्तव भाग घेतला नव्हता. नीरज चोप्राला ल्युसानमध्ये दुसरे स्थान मिळवून पुन्हा ७ गुण मिळाले आहेत. आता नीरज चोप्राकडे एकूण १४ गुण आहेत आणि एकूण गुणांच्या बाबतीत तो ज्युलियन वेबरसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. अँडरसन पीटर्स २१ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर याकुब वालेश १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ज्युलियन वेबर आणि नीरज चोप्रा १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. (Neeraj Chopra)

डायमंड लीगमध्ये चौथी फेरी बाकी आहे, जी ५ सप्टेंबर रोजी झुरिचमध्ये होणार आहे. झुरिच फेरीनंतर गुणांच्या आधारे पहिल्या सहाजणांमध्ये अंतिम सामना होईल. डायमंड लीगचा अंतिम सामना १३ व १४ सप्टेंबर रोजी ब्रुसेल्समध्ये खेळवला जाईल. (Neeraj Chopra)

(हेही वाचा- Nashik Congress च्या होर्डिंगवरुन एकमेव आमदाराचा फोटो गायब, कारण काय?)

लॉसने डायमंड लीग २०२४ च्या दोन आठवड्याआधी नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा झेंडा फडकावला होता. नीरजने ८९.४५ मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर अंतरावर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले. (Neeraj Chopra)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.