Musheer Khan : रस्ते अपघातानंतर मुशीर खानने प्रसिद्ध केला स्वत:चा व्हीडिओ 

120
Musheer Khan : रस्ते अपघातानंतर मुशीर खानने प्रसिद्ध केला स्वत:चा व्हीडिओ 
Musheer Khan : रस्ते अपघातानंतर मुशीर खानने प्रसिद्ध केला स्वत:चा व्हीडिओ 
  • ऋजुता लुकतुके 

मुंबईचा युवा फलंदाज मुशीर खानला (Musheer Khan) इराणी चषकाचा सामना खेळायला जात असताना कानपूर जवळ रस्ते अपघातात दुखापत झाली आहे. त्याच्या मानेचं हाड मोडलं आहे. या गंबीर अपघातानंतर मुशीरने आपल्या वडिलांबरोबरचा एका व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘दुखापत फारशी गंभीर नसून आपण लवकर यातून बरे होऊ,’ हेच या व्हीडिओतून मुशीरला सुचवायचं आहे. त्याचबरोबर अपघातानंतर सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. इराणी चषकाचा मुंबई विरुद्ध शेष भारत हा अंतिम सामना १ ऑक्टोबरपासून लखनौला होणार आहे. या सामन्यासाठीच मुशीर आझमगडहून लखनौला जात होता.

(हेही वाचा- ज्येष्ठ अभिनेते Mithun Chakraborty यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!)

मुशीर मुंबईच्या खेळाडूंबरोबर नव्हता. तो वडिलांबरोबर त्यांचं मूळ गाव आझमगडला सराव करत होता. तिथून सामन्यासाठी तो लखनौला जात असताना कानपूरजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी २ ते ३ वेळा पलटली आणि मुशीरच्या मानेलाच आघात झाला. मुशीरने शेअर केलेल्या व्हीडिओत तो नेक कॉलर घालून दिसत आहे. ‘देवाने मला नवीन आयुष्यच देऊ केलं आहे. त्यासाठी मी अल्लाचे आभार मानतो. माझे वडीलही माझ्याबरोबर होते. तेही अपघातातून सुखरुप वाचले. तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी तुमचे मनापासून आभार,’ असं मुशीरने इन्स्टाग्रामवरील व्हीडिओत म्हटलं आहे. (Musheer Khan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Naushad Khan (@musheerkhan.97)

 सध्या मुशीरला लखनौ इथं मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथून त्याला रजा मिळाली की, मुंबईत त्याच्या दुखापतीची संपूर्ण तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर तो नेमका किती दिवस क्रिकेटपासून दूर राहणार हे कळू शकेल. अलीकडच्या काळात रणजी करंडक आणि दुलिप करंडकात चांगली कामगिरी करून मुशीरने सगळ्यांचं लक्ष स्वत:कडे वेधलं होतं. पण, या दुखापतीचा मोठा फटका त्याला बसू शकतो. तो इराणी करंडकाचा अंतिम सामना आणि रणजी हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. तसंच भारतीय ए संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या संघातून मुशीर आता खेळण्याची शक्यता कमीच आहे. (Musheer Khan)

(हेही वाचा- हिजबुल्लाह म्होरक्याच्या मृत्यूनंतर Pakistan मध्ये हिंसक निदर्शने! पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या)

या व्हीडिओतून मुशीरने मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयने देऊ केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. मुंबईने मुशीरच्या ऐवजी बदली खेळाडूची निवड अजून जाहीर केलेली नाही. (Musheer Khan)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.