Mohammed Shami : मोहम्मद शमी आगामी रणजी स्पर्धेत खेळणार? 

Mohammed Shami : घोट्याच्या दुखापतीनंतर शमी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याच्या वाटेवर आहे 

85
Mohammed Shami : मोहम्मद शमी आगामी रणजी स्पर्धेत खेळणार? 
Mohammed Shami : मोहम्मद शमी आगामी रणजी स्पर्धेत खेळणार? 
  • ऋजुता लुकतुके

घोट्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया केल्यानंतर भारताचा मुख्य तेज गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आता स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याच्या वाटेवर आहे. शस्त्रक्रिया आणि त्यानंतर तंदुरुस्तीसाठीचा वेळ गेल्यानंतर आता त्याने हलका सराव सुरू केला आहे. सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर बंगालकडून तो रणजी स्पर्धेतही खेळू शकेल. बंगाल संघाचे सुरुवातीचे सामने उत्तर प्रदेश आणि बिहार या संघांविरुद्ध आहेत. यातील पहिला सामना ११ ऑक्टोबरला लखनौमध्ये होणार आहे. या दोन सामन्यात खेळण्याचा शमीचा प्रयत्न असेल.

(हेही वाचा- Nashik मध्ये दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत; ATS ची कारवाई)

अर्थात, या दोन सामन्यांमध्ये फक्त दोन दिवसांची विश्रांती आहे. त्यामुळे तो दोनही सामने खेळेल की, यातील एकाच सामन्याची निवड करेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. एकदा देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात झाली की, शमीच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाचा मार्गही मोकळा होईल. कारण, या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शामीने या मालिकेत खेळणं हे कधीही चांगलं असेल. त्यादृष्टीनेच शामीसाठी क्रिकेटचा कार्यक्रम आखला जात आहे.  (Mohammed Shami)

३४ वर्षीय मोहम्मद शमी (Mohammed Shami) १९ नोव्हेंबर २०२३ ला भारतीय संघाकडून आपला शेवटचा सामना खेळला होता. एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्धचा अंतिम सामना हा त्याचा शेवटचा सामना. त्यानंतर घोट्याच्या दुखापतीने त्याला सतावलंय. आधी विश्रांतीने बरी होईल अशी वाटणारी दुखापत पुढे शस्त्रक्रियेपर्यंत पोहोचली. काही महिन्यांपूर्वी शमीवर लंडन इथं शस्त्रक्रिया करण्यात आली.

(हेही वाचा- … तर कारसेवा पुन्हा करू; MLA Nitesh Rane यांचा हल्लाबोल)

सध्या शमी बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत हलका सराव करत आहे. जसप्रीत बुमरानंतर (Jasprit Bumrah) शमी हा भारताचा महत्त्वाचा तेज गोलंदाज असून आतापर्यंत त्याने ६४ कसोटींत २२९ बळी मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो भारताचं प्रमुख शस्त्र ठरणार आहे. (Mohammed Shami)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.