Mohammed Shami : मोहम्मद शमीची नेट्समध्ये गोलंदाजी, व्हीडिओ व्हायरल

Mohammed Shami : शमी क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करणार याबद्दल उत्सुकता आहे.

86
Mohammed Shami : ऑस्ट्रेलियन दौऱ्यात मोहम्मद शमी का नाही?
  • ऋजुता लुकतुके

बंगळुरूतील चिन्नास्वाी मैदानावर रविवारी चक्क भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी गोलंदाजी करताना उपस्थितांना दिसला. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करणारे चाहते सुखावले आहेत. अर्थात, बंगळुरू कसोटी संपल्यावर शमी मैदानात उतरला होता आणि सरावाचा भाग म्हणून कसोटीसाठी तयार खेळपट्टीवर तो गोलंदाजी करत होता. त्याने जवळ जवळ १ तास सलग गोलंदाजीचा सराव केला. कसोटीसाठी बनवलेल्या मुख्य खेळपट्टीवरच त्याचा सराव सुरू होता.

भारताचे प्रशिक्षक अभिषेक नायरही यावेळी त्याच्याबरोबर दिसले आणि दोघं चर्चाही करत होते. अभिषेक नायरच शमीला फलंदाजी करत होते. चेंडूला चांगली दिशा आणि टप्पा शोधण्याचा प्रयत्न शामी करताना दिसला. त्याने काही बाऊन्सही टाकले आणि नायरला काही चेंडूंवर त्याने पेचातही पाडलं.

(हेही वाचा – Gadchiroli मध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक; तीन ते चार माओवादी ठार! धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ)

काही वेळाने शमीने शुभमन गिललाही गोलंदाजी केली आणि भारताचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल मोहम्मद शमीला जवळून पाहत होते. मोहम्मद शमी गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताकडून शेवटचं खेळला आहे. पायाच्या दुखापतीवर देशांतर्गत उपचार घेतल्यानंतर एप्रिल महिन्यात त्याने लंडनमध्ये शस्त्रक्रिया करून घेतली. त्यानंतर बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत तो सराव करत आहे. गेल्याच आठवड्यात कर्णधार रोहित शर्माने शमीच्या पायाला सूज येत असल्याची बातमी मीडियाला दिली होती. पूर्ण तंदुरुस्त नसेल तर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेणार नाही, असंही रोहित तेव्हा म्हणाला होता.

आताही शमी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कधे परतेल याचा अंदाज नाही. आधी तो रणजीमध्ये एखादा सामना खेळेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.