Mission Olympic 2036 : भारताच्या ऑलिम्पिक आयोजन मोहिमेच्या केंद्रस्थानी आग्र्याचा ताजमहल?

Mission Olympic 2036 : भारताने २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी दावा केला आहे.

84
Mission Olympic 2036 : भारताच्या ऑलिम्पिक आयोजन मोहिमेच्या केंद्रस्थानी आग्र्याचा ताजमहल?
  • ऋजुता लुकतुके

भारत २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी उत्सुक असल्याचं एव्हाना आपल्याला ठाऊक आहे. त्यासाठी अहमदाबाद या शहराचा विकास करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असं अलीकडे सरकारच्याच काही कृत्यांमधून वाटत होतं. पण, आता आयोजनाचं स्थळ बदललेलं दिसतंय. नवी दिल्ली किंवा ताजमहल जिथे उभा आहे त्या आग्रा शहराचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं खात्रीलायकरित्या समजतंय.

यापूर्वी भारताने ऑलिम्पिक आयोजनासाठी आपण तयार असल्याचं हमीपत्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेला दिलेलं आहे. आता या प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणजे आयोजनाचं शहर निश्चित करणं आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेची परवानगी मिळवणं. त्यासाठी केंद्राचा दिल्ली आणि आग्रावरही खल सुरू असल्याचं दिसतंय. आंतरराष्ट्रीय परवानगी मिळाली तर यापैकी एक नाव निश्चित केलं जाईल. अहमदाबाद इथं अलीकडेच गुजरात क्रिकेट असोसिएशनने १.३२ लाख क्षमतेचं क्रिकेट मैदान उभारलं आहे. एका क्रीडा संकुलाचा भाग असलेलं हे स्टेडिअम ऑलिम्पिकचं मुख्य स्टेडिअम असेल असं बोललं जात होतं. शिवाय औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा विचारही आयोजनासाठी सुरू होता.

पण, आता या दोन शहरांना मागे टाकून दिल्ली आणि आग्रा या शहरांची चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी काही कारणं देण्यात येत आहेत.

(हेही वाचा – Shinkansen E5 नावाने ओळखली जाणार भारतातील पहिली बुलेट ट्रेन)

  • दिल्ली शहर हे राजधानीचं ठिकाण आहे. देशातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपासूनही हे शहर जवळ आहे
  • दिल्ली व आग्रा या दोन्ही शहरांमध्ये दळणवळणाची साधनं आहेत. तसंच महत्त्वाची ४ विमानतळं या शहरांपासून जवळ आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची सोय होऊ शकते
  • या दोन्ही शहरात नवीन बांधकाम प्रकल्प आणि क्रीडा मैदानं उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे
  • आधुनिक जगातील ८ आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहल जवळच आहे. त्याच्या भोवती स्पर्धेची जाहिरात करता येईल.

ऑलिम्पिक आयोजनासाठी पर्यटन, औद्योगिक विकास, जागेची उपलब्धता, विमानतळांची सोय, लोकवस्ती असे निकषही आतापर्यंत लावले गेले आहेत. त्या निकषांवरूनच या दोन शहरांची निवड सध्या करण्यात आली आहे.

(हेही वाचा – ‘लाडकी बहीण योजने’चा फायदा कुणाला? DCM Devendra Fadnavis म्हणाले, मतदानाचा टक्का…)

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सध्याचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी अलीकडेच जाहीरपणे भारताच्या ऑलिम्पिक आयोजनाच्या दाव्याचं समर्थन केलं आहे. मार्च २०२५ मध्ये समितीच्या नवीन अध्यक्षांची निवड होईल. त्यानंतरच्या बैठकीत ऑलिम्पिक आयोजनाचा मुद्दा पुढे येईल. तेव्हा आयोजनासाठी उत्सुक असलेल्या देशांनी त्यांच्याकडे असलेल्या शहरांचे पर्याय आणि तिथली तयारी समितीसमोर ठेवायची आहे.

२०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी १० च्या वर देशांनी उत्सुकता दाखवल्याचं बाख यांनी पूर्वीच स्पष्ट केलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक सुरू असताना भारतीय पथकाने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे ऑलिम्पिक आयोजनासाठी आपली सिद्धता दाखवायला सुरुवात केली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.