Manu Bhaker : मनु भाकर राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार नाही, त्या कालावधीत करणार युरोपमध्ये सराव

Manu Bhaker : पिस्तुलावरील पकड नीट बसावी यासाठी मनु युरोपमध्ये तयारी करत आहे. 

67
Manu Bhaker : मनु भाकर राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार नाही, त्या कालावधीत करणार युरोपमध्ये सराव
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमधे पिस्तुल प्रकारात दोन कांस्य पदकं जिंकणारी मनु भाकर (Manu Bhaker) सरावाला तर लागली आहे. पण, काही दिवसांत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती खेळणार नाहीए. मनु आणि तिचे प्रशिक्षक जसपाल राणा युरोपमध्ये तिचं पिस्तुल दुरुस्त करून घेत आहेत आणि पिस्तुलाची बदलेली पकड शिकून घेत आहेत. ‘आम्ही सध्या जर्मनीत आहोत आणि मनुच्या पिस्तुलावर काम करतोय. हे आधीच ठरलेलं होतं. त्यामुळे मनु राष्ट्रीय स्पर्धा खेळू शकणार नाहीए,’ असं जसपाल राणाने जर्मनीतूनच मीडियाशी बोलताना सांगितलं आहे.

मनु (Manu Bhaker) १० मीटर आणि ५० मीटर प्रकारात खेळते. त्यासाठी तिला लागणाऱ्या पिस्तुलांची मूठ तिच्या हातात बरोबर बसावी अशी असावी यासाठी ती प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे बदलून घ्यावी लागते. तेच काम सध्या जर्मनीत सुरू आहे. १० मीटरसाठी वापरणारी पिस्तुल तयार करण्याचं काम स्वीत्झर्लंडच्या बेडानो इथं सुरू होतं. त्यानंतर २५ मीटरच्या पिस्तुलावर जर्मनीत निल ग्रिफ इथं काम सुरू आहे.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या बॅगेतून हे काय काय निघालं?)

मनुच्या सरावाला सुरुवात झाल्याचंही जसपाल राणाने स्पष्ट केलं आहे. ‘स्वीत्झर्लंडच्या लुगानो इथं आम्ही सरावाला सुरुवात केली आहे. इथं आमच्यासाठी खास रेंजची सोय करण्यात आली आहे. भारताचे आणखी काही नेमबाजही इथेच सराव करतील. शिवाय राष्ट्रीय स्पर्धा लगेच १३ डिसेंबरला आहेत. तेवढ्यात मनु (Manu Bhaker) आणि इतर नेमबाजाचांही सराव पुरेसा झालेला नसेल. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत मनु खेळणार नाही,’ असं तेव्हाच जसपाल यांनी स्पष्ट केलं.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनुने १० मीटर एअर पिस्तुल आणि १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याची किमया तिने केली आणि ऑलिम्पिक प्रकारात ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ॲथलीट आहे. या यशानंतर भारतात परतलेल्या मनुवर (Manu Bhaker) अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि विविध सत्कार आणि प्रसिद्धी कार्यक्रमांमुळे मनुने नेमबाजीच्या सरावाला अगदी अलीकडे सुरुवात केली आहे. त्यावरून तिच्यावर काहींनी टीकाही केली होती. पण, जसपाल यांना त्याची पर्वा वाटत नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.