Manu Bhaker : ‘लॉस एंजलीसमध्ये पदकांचा रंग बदलण्याचा निर्धार, सराव सुरू’

Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरने दोन कांस्य जिंकून इतिहास रचला आहे. 

98
Manu Bhaker : मनु भाकरला प्रेरणा कुणाकडून मिळते?
Manu Bhaker : मनु भाकरला प्रेरणा कुणाकडून मिळते?
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून मनु भाकरने (Manu Bhaker) ऐतिहासिक कामगिरी केली. १० मीटर एअर पिस्तुल आणि १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक असा दोन स्पर्धांमध्ये तिने कांस्य जिंकलं. एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली. पॅरिस ऑलिम्पिकनंतर मनु भाकरचा काही वेळ विश्रांती आणि बक्षीसं स्वीकारण्यात गेला. पण, त्यानंतर आता नवीन हंगामाची तयारी सुरू केल्याचं तिने सांगितलं आहे. विशेष म्हणजे आणखी ४ वर्षांनी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकची तयारी सुरू केल्याचं तिचं म्हणणं आहे. यावेळी पदकांचा रंग बदलण्याचा तिचा निर्धार आहे.

(हेही वाचा – IPL Mega Auction : आयपीएलचा लिलाव नोव्हेंबरमध्ये परदेशात होणार?)

फक्त २२व्या वर्षी मनु भाकरनं (Manu Bhaker) नेमबाजीत हे यश मिळवलं आहे. आता लगेचच तिने पुढील हंगामाचं नियोजन सुरू केलं आहे. ‘एक यश मिळालं की, ते टिकवून ठेवणं महत्त्वाचं असतं. यशाची लाट असते तेव्हाच काही गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे आता आव्हान आहे ते मिळालेलं यश टिकवून ते आणखी वाढवणं. त्यादृष्टीनेच मी तयारी सुरू केलीय. पुन्हा एकदा लक्ष अचूक भेदायचं हेच मला करायचंय. त्याची तयारी सुरू केलीय. लॉस एंजलीसच्या ऑलिम्पिकमध्ये मला पदकांचा रंग बदलायचा आहे,’ असं मनूने टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलं.

(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy : ‘बॉर्डर – गावसकर चषकात विराट, बुमराची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची’)

नवीन हंगामाची तयारी करतानाच मनूने (Manu Bhaker) आतापर्यंतच्या यशासाठी आपले प्रशिक्षक जसपाल राणा यांचे आभार मानले. ‘ऑलिम्पिक मोहीम ही नेहमीच सांघिक कामगिरी असते. माझ्याही यशात माझे कुटुंबीय आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचा वाटा मोठा आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला सतत प्रोत्साहनच दिलं. मला कधी अतिरिक्त दडपण येऊ दिलं नाही. खरंतर २०२३ मध्ये जसपालबरोबर मी पुन्हा सराव सुरू केला तोच माझ्या पॅरिसमधील यशाचा टर्निंग पॉइंट ठरला. माझा फोकस आणि आत्मविश्वास परतला,’ असं मनूने आवर्जून सांगितलं. मनूने आता नवीन हंगामावर लक्ष केंद्रित केलं आहे. आणि यात आगामी काळात असलेल्या विश्वचषक स्पर्धांमध्ये ती भाग घेणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.