Maharashtra Kho Kho News : महाराष्ट्राचा महिला संघ खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना 

67
Maharashtra Kho Kho News : महाराष्ट्राचा महिला संघ खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना 
Maharashtra Kho Kho News : महाराष्ट्राचा महिला संघ खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना 
ऋजुता लुकतुके 

पश्चिम विभागीय खेलो इंडिया (Khelo India) खो-खो स्पर्धेसाठी (Kho-Kho competition) महाराष्ट्राचा महिला संघ रविवारी गुजरातला रवाना झाला. सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मुंबई इथं या संघाचा निरोप समारंभ पार पडला. ही स्पर्धा गुजरातमध्ये बडोदे इथे होणार आहे. निरोप समारंभवेळी या संघाला शुभेच्छा देण्यासाठी  मुंबई संघटनेचे अध्यक्ष ॲड. अरुण देशमुख, राज्य  संघटनेचे सहसचिव बाळ तोरसकर, मुंबई  संघटनेचे कार्याध्यक्ष सुधाकर राऊळ, खजिनदार डलेश देसाई, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मंदार म्हात्रे व इतर खो-खो प्रेमी उपस्थित होते. (Maharashtra Kho Kho News)

वडोदरा, गुजरात येथील अस्मिता खेलो इंडिया (Asmita Khelo India) लीग स्पर्धेत महिला व मुलींचे संघ भाग घेणार आहेत. पुण्याची कोमल दारवटकर हिची  महाराष्ट्र महिला  खो-खो संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. अस्मिता खेलो इंडिया (Asmita Khelo India) महिला गटाची स्पर्धा ३० सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत बडोदा, गुजरात येथे होणार आहेत. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी हा संघ जाहीर केला आहे. दोन्ही संघास महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांनी शुभेच्छा दिल्या.

(हेही वाचा – आनंद दिघेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंच्या विरोधात कट रचला होता; Sanjay Shirsat यांचा गौप्यस्फोट)

महाराष्ट्राचा महिला संघ : कोमल दारवटकर (कर्णधार), हृतिका राठोड,प्रियंका इंगळे( सर्व पुणे), रेश्मा राठोड, किशोरी मोकाशी, दीक्षा सोनसुरकर ( सर्व ठाणे), संपदा मोरे, ऋतुजा खरे, अमृता माने ( सर्व धाराशिव), साक्षी डाफळे (रत्नागिरी), प्रतीक्षा बिराजदार (सांगली), श्वेता वाघ (पुणे), देविका अहिरे (मुं. उपनगर), सेजल यादव (मुंबई), शिवानी यड्रावकर (धाराशिव), प्रशिक्षक : पुष्कर बर्वे (पुणे)

हेही  पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.