Lionel Messi : लिओनेल मेस्सी आणि टीम अर्जेंटिना पुढील वर्षी भारतात खेळणार

Lionel Messi : मेस्सीची ही पहिलीच भारत भेट असणार आहे.

81
Lionel Messi : लिओनेल मेस्सी आणि टीम अर्जेंटिना पुढील वर्षी भारतात खेळणार
  • ऋजुता लुकतुके

अर्जेंटिनाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ पुढील वर्षी भारताचा दौरा करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच या संघाचं नेतृत्व करणार आहे. केरळमधील राज्य सरकारने या सामन्यांचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे. तिथले क्रीडामंत्री व्ही अब्दुरेहमान यांनी मीडियाशी बोलताना अलीकडेच ही घोषणा केली आहे. केरळ सरकारच या सामन्यांचे आयोजक असतील आणि राज्यातील स्थानिक उद्योगपतींकडून आयोजनाचं प्रायोजकत्व घेतलं जाईल, असं अब्दुरेहमान यांनी सांगितलं. (Lionel Messi)

सध्या २०१६ च्या फिफा विश्वचषकाचे पात्रता सामने सुरू आहेत. अर्जेंटिनाने पेरुचा १-० ने पराभव करत स्पर्धेतील पात्रतेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. तेव्हाच ही सकारात्मक बातमी भारतीय चाहत्यांना मिळाली आहे. २०२६ चा विश्वचषक अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत होणार आहे. दक्षिण अमेरिका खंडातील पात्रता स्पर्धेत पेरु विरुद्ध एकमेव गोल केला तो अर्जेंटिनाच्या लोटारो मार्टिनेझने. दुसऱ्या सत्रात त्याने हा गोल केला. (Lionel Messi)

(हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पांड्या खेळणार सय्यद अली टी-२० स्पर्धा)

विश्वचषक पात्रता स्पर्धेत मार्टिनेझने केलेला हा पाचवा गोल होता. त्यामुळे एका हंगामात सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत त्याने आता सार्वकालिन दिग्गज खेळाडू दिएगो मॅराडोनाशी बरोबरी केली आहे. मार्टेनेझचा हा ३२ वा आंतरराष्ट्रीय गोल होता. दुसऱ्या सत्रात दहाव्याच मिनिटाला मेस्सीच्या एका अप्रतिम पासवर मार्टिनेझने चेंडूंला गोल जाळ्याची दिशा दाखवली. (Lionel Messi)

पात्रता फेरीत आता अर्जेंटिनाचा संघ २५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उरुग्वे संघापेक्षा ते ५ गुणांनी पुढे आहेत. तर १० संघांच्या या गटात पेरुचा संघ सर्वात तळाला आहे. गटातील पहिले ६ देश विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरतील. म्हणजेच संघांना थेट पात्रतेची संधी आहे. (Lionel Messi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.