Kho Kho News : ‘या’ खो-खोपटूंना मिळाली राज्य सरकारची नोकरी

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने एकूण ९५ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती.

131
Kho Kho News : ‘या’ खो-खोपटूंना मिळाली राज्य सरकारची नोकरी
Kho Kho News : ‘या’ खो-खोपटूंना मिळाली राज्य सरकारची नोकरी
  • ऋजुता लुकतुके

महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागात थेट नियुक्ती करण्यात आलेल्या ९५ पैकी ३२ जण हे खोखोपटू आहेत. यातही ११ क्रीडा अधिकारी (गट ब राजपत्रित) आणि २१ शिपाई (गट ड) पदावर नियुक्त झाले आहेत. क्रीडा विभागाकडून ही यादी नुकतीच जाहीर झाली आहे. आणि पहिल्यांदाच खोखोपटूंनी इतकं मोठं यश मिळवलं आहे. महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे सचिव चंद्रजीत जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पाठपुरावा करून खेळाडूंना नोकरी मिळवण्यात मदत केली आहे. (Kho Kho News)

(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : अंजीरवाडी गणेशोत्सव मंडळाचा यंदा खर्चाचा आखडता हात)

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विविघ विभागांमध्ये ही पदं निर्माण करण्यात आली असून त्यामध्ये लिपिक आणि शिपाई पदांचा समावेश आहे. तर पदवीधर आणि गुणवत्ताधारक खेळाडूंना नोकरीत वाव मिळावा यासाठी अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने नवीन यादी जाहीर केली आहे. राज्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. नियुक्त झालेल्या खेळाडुंच्या यादीत अमृती कोकितकर, ऐश्वर्या सावंत, नरेश सावंत, दिपाली सबाने, योगेश मोरे, सुयश गरगटे, प्रियंका इंगळे, गौरी शिंदे, निकिता पवार, अक्षय भांगरे यांची क्रीडा अधिकारी पदासाठी तर शिपाई पदावर सोनाली मोकासे, प्रियंका येळे, श्वेता गवळी, मिनल भोईर, पौर्णिमा सकपाळ, रेश्मा राठोड, प्रियंका भोपी, मिलिंद कुरपे, सागर पोतदार, जान्हवी पेठे, काजल भोर, किरण शिंदे, ऋतुजा खरे, प्रिती काळे, अविनाश देसाई, विजय शिंदे, निखिल मस्के, सुशांत कलढोणे, फैजान पठाण, संपदा मोरे, मयुरी पवार यांचा समावेश आहे. याआधी आयकर विभागात सुध्दा खोखो खेळाडूंची भरती झाली होती. (Kho Kho News)

या नियुक्त्यांसाठी खो खो असोसिएशनकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde),  उपमुख्यमंत्री व खोखो असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar), राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, राज्य संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर तसंच क्रीडा आयुक्त राजेश देशमुख यांचे आभार मानण्यात आले आहेत. (Kho Kho News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.