Jay Shah : जय शाहांना आयसीसीच्या १५ सदस्य देशांचा पाठिंबा; पाकिस्तानने काय केलं असेल?

Jay Shah : आयसीसीचे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ १ डिसेंबरला सुरू होणार आहे 

154
Jay Shah : आयसीसी अध्यक्ष म्हणून जय शाह यांच्यासमोरील ५ आव्हानं 
Jay Shah : आयसीसी अध्यक्ष म्हणून जय शाह यांच्यासमोरील ५ आव्हानं 
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयचे सध्याचे सचिव जय शाह (Jay Shah) यांची मंगळवारी आयसीसीचे नवीन अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. १ डिसेंबर २०२४ पासून जय शाह आपल्या पदाचा पदभार स्वीकारतील. अध्यक्ष म्हणून क्रिकेटचा विस्तार इतर खंडात करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचं शाह यांनी निवडीनंतर लगेचच स्पष्ट केलं आहे. २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकच्या निमित्ताने ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटने शिरकाव केला आहे. आता ही लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न आयसीसीकडून होणार आहे. जय शाह यांच्या या भूमिकेचं इतर क्रिकेट मंडळांनी स्वागतच केलं आहे.

(हेही वाचा- उभारण्यात येणारा शिवरायांचा नवा पुतळा लौकिकाला साजेसा हवा, पैसा कमी पडू देणार नाही: CM Eknath Shinde)

त्यामुळे आयसीसीच्या १६ पैकी १५ सदस्य मंडळांनी जय शाह यांना निवडणुकीपूर्वीच पाठिंबा देऊ केला होता. आयसीसीचे १६ सदस्य देश आहेत. अशावेळी पाकिस्तानची भूमिका यात नेमकी काय होती, असा प्रश्न भारतात पडणं स्वाभाविक आहे. (Jay Shah)

न्यूज १८ या वृत्त वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तान आयसीसीच्या बैठकीत फक्त मूक साक्षीदार होता. जय शाह (Jay Shah) यांच्या नावावर चर्चा सुरू असताना पाक मंडळाच्या प्रतिनिधीने ना विरोध केला, ना पाठिंबा दिला. अख्ख्या चर्चेत पाक प्रतिनिधीने फक्त बघ्याची भूमिका निभावली.

(हेही वाचा- Crime News : गोमांसाची तस्करी करणारा कासमअली दोन वर्षांसाठी तडीपार)

इंग्लंड (England), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) या क्रिकेट मंडळांचा आधीच पाठिंबा मिळाल्यामुळे जय शाह यांचं अध्यक्षपद हे जवळ जवळ निश्चितच होतं. आणि आयसीसीवर लागलेली वर्णी ही जय शाह यांच्यासाठी बीसीसीआयमध्येही फायद्याचीच आहे. अलीकडेच बीसीसीआयने भारतीय क्रीडा धोरणानुसार, आपल्या धोरणात काही बदल केले आहेत. त्यानुसार, एखादी व्यक्ती बीसीसीआयच्या कार्यकारिणीत फक्त तीन वेळा राहू शकते. आणि यातही ६ वर्षांच्या कालावधीनंतर त्या व्यक्तीला मध्ये विश्रांती घ्यावीच लागते.  (Jay Shah)

जय शाह हे २०१९ पासून बीसीसीआयमध्ये कार्यरत आहेत. पुढील वर्षी २०२५ मध्ये त्यांना ६ वर्षं झाली असती. म्हणजे पुढील वर्षी त्यांना विश्रांती घ्यावी लागली असती. पण, विश्रांतीच्या काळात ते आयसीसीमध्ये कार्यरत असतील, ते सुद्धा अध्यक्ष म्हणून. आणि तिथे ते ४ वर्षं पाहिले तर त्यांना बीसीसीआयमध्ये वापसीही नियमानुसार, शक्य होईल.  (Jay Shah)

(हेही वाचा- Jalgaon News: जखमी गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू; मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी)

आयसीसीच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यावर जय शाह यांनी नवीन जबाबदारीचा नम्रतेनं स्वीकार करत असल्याचं म्हटलंय. ‘क्रिकेटमध्ये आपण अशा मुक्कामावर आहोत की, आपल्याला क्रिकेटची लोकप्रियता वाढवायची आहे. विस्तार करायचा आहे. आणि त्यासाठी कदाचित टी-२० क्रिकेटला प्रोत्साहन द्यावं लागणार आहे. पण, त्याचवेळी क्रिकेटचा गाभा असलेलं कसोटी क्रिकेट आपल्याला विसरायचं नाही आहे. हे संतुलन शक्य करणं ही मोठी जबाबदारी असणार आहे. कसोटीचं महत्त्व कमी न होता, उलट वाढेल, असं आपलं वर्तन असेल,’ अशी हमी जय शाह यांनी दिली आहे. (Jay Shah)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.