Jay Shah ICC President : ‘जय शाह अध्यक्ष झाल्यामुळे क्रिकेट जगभर पसरले,’ – सुनील गावसकर 

Jay Shah ICC President : कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचा जय शाह यांचा मानस 

78
Jay Shah ICC President : ‘जय शाह अध्यक्ष झाल्यामुळे क्रिकेट जगभर पसरले,’ - सुनील गावसकर 
Jay Shah ICC President : ‘जय शाह अध्यक्ष झाल्यामुळे क्रिकेट जगभर पसरले,’ - सुनील गावसकर 
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah ICC President) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात, आयसीसीचे सगळ्यात तरुण अध्यक्ष बनल्यानंतर क्रिकेट जगतातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनंदन करणारे एक आहेत दस्तुरखुद्द लिटिलमास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar). ‘क्रिकेट आता सर्वदूर पोहोचलं तर मला आश्चर्य वाटणार नाही,’ असं गावसकर टाईम्स समुहाशी बोलताना म्हणाले आहेत.

(हेही वाचा- Dahi Handi उत्सवादरम्यान २३८ गोविंदा जखमी; जखमींमध्ये बालगोविंदांचाही समावेश)

‘भारताच्या सर्वच आयसीसी अध्यक्षांनी (Jay Shah ICC President) क्रिकेट खेळाला पुढेच नेलं आहे. त्यांच्या काळात खेळाचा महसूल वाढला. खेळ आणखी संघटित झाला. आता क्रिकेटला वेध लागले आहेत ते ऑलिम्पिक समावेशाचे. सगळ्या खंडांत ता खेळ पोहोचण्याचे. त्यासाठी जय शाह यांचं तरुण व्यक्तिमत्त्व अगदी योग्य आहे,’ असं गावसकर यांनी बोलून दाखवलं आहे.

३५ व्या वर्षी जय शाह आयसीसीचे (Jay Shah ICC President) सगळ्यात तरुण अध्यक्ष होणार आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये महिला व पुरुषांच्या क्रिकेटमध्ये समानता तसंच देशांतर्गत खेळाडूंनाही योग्य मानधन मिळवून देण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला आहे. आता असोसिएशन सदस्यांमध्ये क्रिकेट रुजवण्याचा प्रयत्न ते करणार आहेत.

(हेही वाचा- Virat Kohli, Rohit Sharma : विराट, रोहित भारतासाठी आणखी किती वर्ष खेळू शकतील?)

दरम्यान खुद्द जय शाह यांनीही अध्यक्ष (Jay Shah ICC President) म्हणून बिनविरोध निवड झाल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आयसीसीच्या सदस्य देशांच्या अभिनंदनाचा स्वीकार करून त्यांनी क्रिकेटची पुढील दिशा कशी असेल यावर आपलं मत मांडलं. ‘जागतिक स्तरावर क्रिकेटचा दर्जा वाढावा यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. आणि महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट खेळाचा पाया असलेलं कसोटी क्रिकेट जिवंत राहील याची दक्षता घेईन,’ असं जय शाह यांनी बोलून दाखवलं आहे.

त्याचबरोबर क्रिकेटचे तीनही प्रकार एकत्र कसे नांदतील, याचा निश्चित आराखडा तयार करण्याबद्दलही ते आग्रही आहेत. २०१९ पासून जय शाह बीसीसीआयमध्ये सक्रिय आहेत. सध्या ते बीसीसीआयचे सचिव तर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. ग्रेग बार्कले (Greg Barclay) या सध्याच्या आयसीसी अध्यक्षांचा कार्यकाल नोव्हेंबरमध्ये संपल्यावर जय शाह पदभार हातात घेतील. शरद पवार (Sharad Pawar), जगमोहन दालमिया (Jagmohan Dalmiya), एन श्रीनिवासन (N Srinivasan) आणि शशांक मनोहर (Shashank Manohar) यांच्यानंतरचे ते पाचवे भारतीय अध्यक्ष आहेत. (Jay Shah ICC President)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.