IPL Valuation : आयपीएल स्पर्धेचं मूल्यांकन १६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या पार

IPL Valuation : चेन्नईचा संघ अपेक्षेप्रमाणेच सगळ्यात मौल्यवान संघ ठरला आहे.

175
IPL Valuation : आयपीएल स्पर्धेचं मूल्यांकन १६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या पार
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या मूल्यांकनात (IPL Valuation) २०२४ साली ६.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. स्पर्धेचं एकूण मूल्य आता १६.४ अब्ज अमेरिकन डॉलर अर्थात १.३४ लाख कोटी रुपये इतकं झालं आहे. अमेरिकन बँक हॉलिहन लॉकीनं है मूल्यांकन केलं आहे. मागच्या एका वर्षांत स्पर्धेचं मूल्यांकन २८,००० कोटी रुपयांनी वाढलं आहे. स्पर्धेचं मूल्यांकन वाढण्यामागे महत्त्वाचा हात टाटा सन्स कंपनीबरोबर झालेल्या प्रायोजकत्व कराराचा आहे. २०२४ ते २०२८ या पाच वर्षांसाठी झालेला हा करार तब्बल ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका आहे. (IPL Valuation)

या आधीचा टाटा कंपनीचा करार हा ५० टक्के कमी मूल्याचा होता. (IPL Valuation)

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचं मतदान नाही; मनसेच्या बैठकीत Raj Thackeray काय म्हणाले?)

‘या’ संघाच्या मूल्यात सगळ्यात जास्त वाढ

‘स्पर्धेत होत असलेली घसघशीत गुंतवणूक आणि गेल्यावर्षी मीडिया हक्कांच्या मूल्यात झालेली वाढ या स्पर्धेवरील ब्रँडचा विश्वास दाखवून देते. या स्पर्धेशी जोडले गेल्यामुळे ब्रँड मूल्यात वाढ होते असा कंपन्यांना विश्वास आहे,’ असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ऑलिम्पिक, फिफा विश्वचषक आणि क्रिकेट विश्वचषकाच्या खालोखाल आयपीएल (IPL) स्पर्धेनं मूल्यांकनाच्या बाबतीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. ही स्पर्धा जगभरात भारताबाहेर १ अब्ज लोकांपर्यंत पोहोचते असा मूल्यांकन करणाऱ्या बँकेचा अंदाज आहे. स्पर्धेच्या मूल्यांकनामध्ये आर्थिक देवाणघेवाणीबरोबरच अमूर्त मालमत्ताही गृहित धरण्यात येते. (IPL Valuation)

चेन्नई सुपर किंग्ज संघाचं मूल्य आयपीएल फ्रँचाईजींमध्ये सर्वाधिक आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मूल्यात एका वर्षात सगळ्यात जास्त वाढ झाली आहे. मागच्या वर्षभरातील सगळ्यात मोठा ब्रँडिंग करार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मिळवला. कतार एअरवेजनी संघात प्रायोजकत्वासाठी ७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मूल्यांकनाच्या बाबतीत चेन्नईच्या खालोखाल बंगळुरू फ्रँचाईजीचाच क्रमांक लागतो. त्यांचा मूल्यांकन २२७ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकं आहे. मुंबई इंडियन्स संघाचं मूल्य २०४ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकं आहे. तर राजस्थान संघाचं मूल्य आहे १३३ दशलक्ष अमेरिकन डॉलर. सगळ्यात कमी मूल्य लखनै सुपरजायंट्स संघाचं ९१ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकं आहे. (IPL Valuation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.