IPL Retention : आपल्या संघात कायम ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्स रोहित आणि बुमराहवर हार्दिक, सूर्यकुमार इतकेच पैसे मोजेल का?

IPL Retention : खेळाडू कायम ठेवण्याचे आयपीएलचे नवीन नियम जटील आहेत.

98
IPL Retention : आपल्या संघात कायम ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्स रोहित आणि बुमराहवर हार्दिक, सूर्यकुमार इतकेच पैसे मोजेल का?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी १० ही संघ मालक आपल्या कुठल्या खेळाडूंना कायम राखतात हे ३१ ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट होणार आहे. तेव्हाच स्पष्ट होईल की, काही खेळाडूंची किंमत त्यांच्या संघ मालकांच्या लेखी किती आहे. आयपीएलच्या काही जटील नियमांमुले यंदा खेळाडू कायम राखण्याची संधांची रणनीती काही प्रमाणात बदलू शकते. नवीन नियमांमुळे संघ मालकांना ६ खेळाडू आपल्याकडे राखता येणार असले तरी चौथ्या आणि पाचव्या खेळाडूला राखून ठेवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे खेळाडू ठरवताना संघांनाही सावध राहावं लागेल. (IPL Retention)

मेगा लिलावासाठी संघ मालक त्यांच्याकडे १२० कोटी रुपये बाळगू शकतील. पण, कायम ठेवलेल्या प्रत्येक खेळाडूमागे संघांची ही रक्कम कमी होत जाणार आहे. सहाही खेळाडू कायम ठेवले तर संघांची तिजोरी लिलावापूर्वीच ७९ कोटींनी कमी होणार आहे. मग उर्वरित खेळाडू विकत घेण्यासाठी संघांकडे उरतील ४१ कोटी रुपये. (IPL Retention)

(हेही वाचा – India Monsoon : भारतात दरवर्षीच्या तुलनेत ८ टक्के जास्त पाऊस, २०२० नंतरचा सर्वोत्तम मान्सून)

आता मुंबई इंडियन्स संघाचा विचार केला तर त्यांचा प्रयत्न असेल तो रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना संघात कायम ठेवण्याचा. हार्दिक आणि सूर्या हे कायम ठेवलेले प्रमुख खेळाडू असतील तर त्यांच्यासाठी संघाला अनुक्रमे १८ आणि १४ कोटी रुपये मोजावे लागतील. त्यानंतर चौथा आणि पाचवा क्रमांक म्हणून रोहित आणि बुमराहची निवड करायची झाली तर त्यांच्यासाठीही संघाला अनुक्रमे १८ आणि १४ कोटी रुपये मोजावे लागतील. त्यानंतर पाचवा खेळाडू म्हणून संघ इशान किशनचा पर्याय स्वीकारू शकतो. अशावेळी इशान किशनला ११ कोटी रुपयांत आपल्याकडे राखता येईल. (IPL Retention)

संघ तुमच्यासाठी किती पैसे बाजूला ठेवू शकतो, यावरून संघाच्या लेखी खेळाडूची किती किंमत आहे हे ही स्पष्ट होणार आहे. यंदा ही रक्कम वेगवेगळी आहे. पूर्वी कायम ठेवलेल्या प्रत्येक खेळाडूमागे संघाला एकसमान रक्कम द्यावी लागत होती. फक्त मुंबई इंडियन्सच नाही तर सगळ्याच प्रमुख संघांमध्ये खेळाडूंविषयीची रणनीती आणि प्रमुख खेळाडूंवरील विश्वास व्यक्त करण्याची कृती यासाठी कसरत होणार आहे. (IPL Retention)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.