IPL Retention : कोणते खेळाडू कायम ठेवणार ते ठरवण्यासाठी आयपीएल फ्रँचाईजींकडे आहेत ‘इतके’ दिवस

IPL Retention : शनिवारी आयपीएलने नवीन हंगामासाठीचे खेळाडूंविषयीचे सर्व नियम उघड केले आहेत 

76
IPL Retention : कोणते खेळाडू कायम राखणार ते ठरवण्यासाठी आयपीएल फ्रँचाईजींकडे आहेत ‘इतके’ दिवस
IPL Retention : कोणते खेळाडू कायम ठेवणार ते ठरवण्यासाठी आयपीएल फ्रँचाईजींकडे आहेत ‘इतके’ दिवस
  • ऋजुता लुकतुके 

इतके दिवस आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी ज्या गोष्टीची उत्सुकता सगळ्यांना होती, ते खेळाडूंविषयीचे नियम आता बीसीसीआयने उघड केले आहेत. आताच्या खेळाडूंपैकी ६ खेळाडू फ्रँचाईजी आपल्याकडे कायम ठेवू शकणार आहेत. पाच खेळाडू थेट आणि एक खेळाडू राईट टू मॅच नियमाचा वापर करून आपल्याकडे ठेवता येणार आहे. आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले कमाल ५ आणि देशांतर्गत क्रिकेट खेळलेले कमाल २ क्रिकेटपटू फ्रँचाईजी आपल्याकडे राखू शकतात. आता फ्रँचाईजींना आपण कोणते खेळाडू आपल्याकडे कायम राखणार याची यादी आयपीएल प्रशासनाला सादर करावी लागेल. (IPL Retention)

(हेही वाचा- Baramati News: बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कोयत्याने वार करून हत्या; परिसरात खळबळ)

त्यानंतर उर्वरित खेळाडूंचा लिलाव वर्षअखेरीस पार पडेल. खेळाडू कायम ठेवण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे अशी बातमी क्रिकबझने दिली आहे. ३१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संघ मालकांनी आपली यादी आयपीएलला सादर करायची आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत आपल्या राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू हा अमुभवी मानला जाईल. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा कुठल्याही प्रकारात तो देशासाठी खेळला असेल तर त्याला अनुभवीच मानण्यात येईल. पण, ३१ ऑक्टोबर ते लिलावाच्या दिवशीपर्यंत खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळला तर मात्र अशा खेळाडूला नवखा मानलं जाईल. (IPL Retention)

खेळाडूंना कायम ठेवतानाही संघ एकप्रकारे त्यासाठी किंमत मोजत असतात. कारण, राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या किमती एवढी रक्कम लिलावासाठी उपलब्ध रकमेतून कापली जात असते. आणि यंदा चौथ्या ते सहाव्या खेळाडूला राखून ठेवण्यासाठीची रक्कम ही वाढवण्यात आली आहे. म्हणजे असं की, लिलावाच्या दिवशी संघ मालक प्रत्येकी १२० कोटी रुपये खेळाडूंवर खर्च करू शकतात. पहिल्या तीन कायम ठेवलेल्या खेळाडूंसाठी संघ मालकांना अनुक्रमे १८ कोटी, १४ कोटी आणि ११ कोटी मोजावे लागतील. म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या १२० कोटींपैकी त्यांना फक्त ७७ कोटी रुपयेच नवीन खेळाडूंवर खर्च करता येतील. पुढील दोन खेळाडूंसाठी आता सुधारित नियमांप्रमाणे अनुक्रमे १८ आणि १४ कोटी रुपये मोजावे लागतील. त्यामुळे संघ मालकांनी सहाही खेळाडू कायम राखले तर त्यांच्याकडे नवीन खेळाडूंच्या खरेदीसाठी फक्त ४५ कोटी रुपयेच शिल्लक राहतील. (IPL Retention)

(हेही वाचा- BCCI Center of Excellence : बीसीसीआयच्या नवीन क्रिकेट अकादमी सरावासाठी तीन प्रकारच्या खेळपट्ट्या )

अननुभवी खेळाडूला कायम ठेवण्यासाठी संघ मालकांना ४ कोटी रुपये मोजावे लागतील. (IPL Retention)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.