IPL 2023 : मुंबईचा दारूण पराभव, पण गुजरातला झाला फायदा! आयपीएल पॉईंट टेबलची स्थिती काय?

65
IPL

IPL 2023 आयपीएलचा थरार दिवसेंदिवस वाढत चालला असून, स्पर्धेचा पहिला टप्पा संपला आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघ प्रत्येकी सात सामने खेळला असून साखळी फेरी गाठण्यासाठी संघामध्ये चुरस बघायला मिळत आहे. मंगळवारी झालेल्या गुजरात विरूद्ध मुंबईच्या सामन्यात मुंबईचा दारूण पराभव झाला.

( हेही वाचा : Kokan Railway : गणपतीला कोकणात जायचंय ?4 महिने आधी सुरू होणार रेल्वेचे बुकिंग, कसे असेल वेळापत्रक)

प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातने २०७ धावा केल्या. गुजरातची सुरूवात खराब झाली. साहा लवकर बाद झाल्यावर शुभमन गिल एका बाजूने फटकेबाजी करत होता, पण त्याला कोणीही साथ देत नव्हते. गिल बाद झाल्यानंतर अभिनव मनोहर आणि मिलरच्या भागदीरीने गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली.

२०८ धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची खराब सुरूवात झाली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या दोन धावांवर बाद झाला. मुंबईला पावरप्लेचा योग्य रितीने वापर करता आला नाही. ग्रीनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तोही ३३ धावा काढून बाद झाला. त्याच बरोबर मुंबईचा डाव कोसळायला सुरूवात झाली. शेवटी आलेल्या नेहाल वधेराने २१ चेंडूत ४० धांवाची खेळी केली.

IPL गुणतालिकेत बदल

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने यंदा दमदार कामगिरी केली आहे. गुजरातने सात सामन्यात पाच विजय मिळवत दहा गुणांची कमाई केली आहे. दहा गुणांसह गुजरातचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचा संघ दहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दोन्ही संघाचे गुण जरी समान असले तरी चेन्नईचा रन रेट गुजरात पेक्षा चांगला आहे. तर राजस्थान आणि लखौन अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्ठानावर आहे. त्यांचे प्रत्येकी आठ गुण आहेत.

त्याचबरोबर बंगळूरू आणि पंजाबचे ही आठ गुण असून सरस नेट रनरेटच्या आधारावर राजस्थान तिसऱ्या तर लखनौ चौथ्या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्स सातव्या क्रमांकावर असून मुंबईने सात सामन्यात फक्त तीन विजय मिळवले आहेत. तर कोलकाता संघ चार गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद नवव्या तर दिल्ली दहाव्या स्थानावर आहे. कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद यांचे प्रत्येकी चार गुण आहेत. तसेच या तिन्ही संघाना IPL चे स्पर्धेतील उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत.

हेही पहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.