IPL Mega Auction : रिषभ पंतसाठी या तीन संघांनी लावली ‘फिल्डिंग’

IPL Mega Auction : रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स फ्रँचाईजी सोडणार असल्याची बातमी आहे.

114
IPL Mega Auction : रिषभ पंतसाठी या तीन संघांनी लावली ‘फिल्डिंग’
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी संघ मालक कोणते खेळाडू आपल्याकडे कायम ठेवायचे याची यादी करत आहेत. दुसरीकडे बाहेरून कुणाला विकत घ्यायचं याचीही रणनीती आखणं सुरू आहे. अशावेळी एक बातमी बाहेर आली ती म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघाचा सध्याचा कर्णधार रिषभ पंत फ्रँचाईजीवर नाराज असल्याची. इतकंच नाही तर तो संघ सोडण्याचा विचारच करत आहे आणि दिल्ली संघानेही नवीन कर्णधाराचा शोध सुरू केल्याचं समजतंय. रिषभ पंतने त्यानंतर अलीकडे सोशल मीडियावर ‘काहीवेळा गप्प राहणंच हिताचं असतं,’ अशी एक पोस्टही केली होती. दिल्ली कॅपिटल्स आयपीएलच्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. त्याच्या संघात असे खेळाडू आहेत जे कायम ठेवण्याचे दावेदार आहेत. त्यात कर्णधार रिषभ पंत, अक्षर पटेल, कुलदीप यादव, फ्रेझर मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड वॉर्नर हे प्रमुख आहेत. आता फ्रेंचायझी कोणाला स्वतःकडे ठेवते हे पाहायचे आहे.

(हेही वाचा – Jemima Rodrigues : महिला क्रिकेटपटू जेमायमाह रॉड्रिगेस वडिलांमुळे अडचणीत; या क्लबने रद्द केलं सदस्यत्व)

अर्थात, रिषभचं दिल्ली सोडून जाणं इतर संघांच्या फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळे बंगळुरू आणि चेन्नईसह आणखीही एक फ्रँचाईजी त्याला आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नांत असल्याचं समजतंय. रिषभ सध्या मैदानात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने ९९ धावांची दमदार खेळी केली. पण, दिल्ली कॅपिटल्स संघ त्याला कर्णधारपदावरून हटवू पाहत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, दिल्ली कॅपिटल्स नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. पंतच्या जागी अक्षर पटेल कर्णधार होऊ शकतो.

त्यानंतरच रिषभने इन्स्टाग्रामवर ती पोस्ट लिहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने सोशल मीडियावर लिहिले, ‘कधीकधी शांत राहणे चांगले असते आणि देव लोकांना दाखवतो. याशिवाय, पंतने इंस्टाग्रामवर दिल्ली कॅपिटल्सला अनफॉलो केले आहे.

(हेही वाचा – SSC – HSC Exam : अभ्यासाला लागा! दहावी बारावीच्या परिक्षेची तारिख ठरली)

New Project 2024 10 24T144506.065

ऋषभने आयपीएल २०२१ पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारले. श्रेयस अय्यरच्या जागी तो कर्णधार झाला. अय्यर दुखापतीमुळे मोसमातून बाहेर होता. यानंतर, जेव्हा तो परतला तेव्हा फ्रेंचायझीने पंतला कर्णधारपदावर कायम ठेवले. याच कारणामुळे अय्यरने हंगाम संपल्यानंतर लिलावात भाग घेतला. कोलकाता नाईट रायडर्सने त्याचा संघात समावेश केला. अय्यरने आपल्या नेतृत्वाखाली कोलकात्याला गेल्या मोसमात विजेतेपद मिळवून दिलं होतं.

दिल्ली कॅपिटल्स संघाची साधारण कामगिरी हे मालकांच्या नवीन कर्णधार शोधण्याचे कारण असू शकते. फ्रँचायझीने अलीकडेच हेमांग बदानी यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, तर वेणुगोपाल राव यांची क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएल फ्रँचायझींना बीसीसीआयकडे कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. आयपीएलचा मेगा लिलाव नोव्हेंबरमध्ये होऊ शकतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.