IPL Mega Auction : आयपीएलचा लिलाव नोव्हेंबरमध्ये परदेशात होणार?

IPL Mega Auction : हा लिलाव संयुक्त अरब अमिरातीत होण्याची शक्यता आहे

86
IPL Mega Auction : आयपीएलचा लिलाव नोव्हेंबरमध्ये परदेशात होणार?
IPL Mega Auction : आयपीएलचा लिलाव नोव्हेंबरमध्ये परदेशात होणार?
  • ऋजुता लुकतुके 

आयपीएलच्या अठराव्या हंगामापूर्वी खेळाडूंना मेगा लिलाव होणार आहे. हा लिलाव आता भारताबाहेर संयुक्त अरब अमिरातीत घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. गेल्या खेपेलाही हा लिलाव दुबईत झाला होता. याखेरिज दोहा, आबूधाबी आणि सौदि अरेबिया असे पर्याय बीसीसीआयसमोर आहेत. क्रिकबझ वेबसाईटने आयपीएलमधील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. (IPL Mega Auction)

(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy : ‘बॉर्डर – गावसकर चषकात विराट, बुमराची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची’)

लिलाव कधीही झाला तरी सध्या संघ मालकांना समस्या भेडसावतेय ती आयपीएल खेळाडू रिटेन्शनच्या नवीन नियमांची. म्हणजे बीसीसीआयने नवीन नियम जाहीर केलेले नाहीत. त्या अभावी कुठल्या खेळाडूंना लिलावापूर्वी आपल्या ताफ्यात कायम ठेवता येणार हा महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय संघमालक घेऊ शकत नाहीएत. लिलाव जर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार असेल तर १५ नोव्हेंबर ही तारीख फ्रँचाईजींना खेळाडू कायम ठेवण्यासाठी दिली जाऊ शकते. (IPL Mega Auction)

सध्या बीसीसीआयने संघ मालकांना ईमेल करून रिटेंन्शन नियमांवर काम सुरू असल्याचं कळवलं आहे. तसंच संघ मालकांकडून त्यांच्या अपेक्षाही जाणून घेतल्या आहेत. आता लिलावाचा कार्यक्रम ठरेल तेव्हाच बीसीसीआयकडून नवीन नियमांची स्पष्टताही अपेक्षित आहे. (IPL Mega Auction)

(हेही वाचा- BMC Budget : आमदार, खासदार यांना यंदा प्रत्येकी १५ कोटींचा विकासनिधी?)

दरम्यान, आयपीएलमधील फ्रँचाईजी लिलावापूर्वी आपला प्रशिक्षकांचा ताफा निश्चित करण्यामागे लागले आहेत. गौतम गंभीर, रायन टेन ड्युसकाटे, मॉर्नी मॉर्केल आणि अभिषेक नायर आता भारतीय राष्ट्रीय संघाच्या सेवेत आहेत. तर राहुल द्रविड, विक्रम राठोड आणि पारस म्हांब्रे राष्ट्रीय जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. पैकी, राहुल द्रविड आणि विक्रम राठोड राजस्थान रॉयल्स फ्रँचाईजीबरोबर काम करणार आहेत. तर पारस म्हांब्रेही राजस्थानच्या ताफ्यातच सामील होईल अशी शक्यता आहे.

कोलकाता संघाने गौतम गंभीरच्या जागी कुमार संगकाराची नेमणूक करण्याची तयारी चालवली आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.