IPL Mega Auction 2024 : आयपीएलच्या लिलावातील वयाने मोठा आणि सगळ्यात लहान खेळाडू कोण?

IPL Mega Auction 2024 : आयपीएलचा मेगा लिलाव २४ आणि २५ तारखेला जेद्दाह इथं होणार आहे. 

125
IPL Mega Auction : आयपीएल संघ मालकांकडे लिलावानंतर उरलेल्या पैशाचं काय होणार?
  • ऋजुता लुकतुके

एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली कसोटी रंगतदार वळणावर आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सौदी अरेबियात आयपीएलच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलावही रंगणार आहे. पर्थ कसोटीत नितिश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांनी भारतीय संघात पदार्पण केलं आहे. त्यामुळे त्यांचा समावेश आता अनुभवी खेळाडूंमध्ये होईल. २४ आणि २५ तारखेला होणाऱ्या मेगा लिलावासाठी बीसीसीआयने ५७४ खेळाडूंची अंतिम यादी यापूर्वीच जाहीर केली आहे. यापैकी ३६६ खेळाडू हे भारतीय आहेत. तर २०८ खेळाडू परदेशी आहेत. (IPL Mega Auction 2024)

(हेही वाचा – UBT: विधानसभा निकालापूर्वी भाजपाचा ‘हा’ नेता उबाठा गटात सामील)

या खेळाडूंमध्ये ३१८ भारतीय खेळाडू हे अननुभवी म्हणजे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नसलेले आहेत. तर १२ परदेशी खेळाडू अननुभवी आहेत. महत्त्वाचं म्हणजे आगामी लिलावात संघांकडे २०४ जागा रिक्त आहे  आणि यातील ७० खेळाडू हे परदेशी असू शकतात. खेळाडूंसाठी असलेली कमाल आधारभूत किंमत ही २ कोटी रुपये आहे. ८१ खेळाडूंनी या किमतीवरच आपली लिलावासाठी नोंदणी केली आहे. (IPL Mega Auction 2024)

(हेही वाचा – Gyanvapi Case : ज्ञानवापीवर हिंदू पक्षाचा मोठा विजय, शिवलिंगाच्या पाहणीत मुस्लिम पक्षाला धक्का)

लिलावासाठी नोंदणी झालेला वयाने सगळ्याच मोठा क्रिकेटपटू आहे इंग्लंडचा जेम्स अँडरसन. ४२ व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यामुळे नवीन नियमांनुसार त्याला अननुभवी खेळाडूचा दर्जा मिळेल. तर तो पहिल्यांदाच आयपीएलच्या लिलावात सहभागी होणार आहे. वयाने सगळ्यात लहान खेळाडू आहे तो १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी. तो अर्थातच अननुभवी श्रेणीतील आहे. (IPL Mega Auction 2024)

(हेही वाचा – Assembly Election : विधानसभेत चालला नाही मुस्लिमांचा फतवा; ‘एक है तो सेफ है’ ने वाढला हिंदूंच्या मतांचा टक्का)

आयपीएलच्या मेगा लिलावातील वयाने सगळ्यात मोठे खेळाडू

जेम्स अँडरसन (इंग्लंड) – ४२ वर्षं (तेज गोलंदाज)

फाफ दू प्लेसिस (द आफ्रिका) – ४० वर्ष (फलंदाज)

महम्मद नाबी (अफगाणिस्तान) – ४० वर्ष (अष्टपैलू)

रवी अश्विन (भारत) – ३८ वर्ष (फिरकीपटू)

(हेही वाचा – Assembly Election Results 2024: अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपाची मोठी फिल्डिंग; ‘या’ ६ नेत्यांवर सोपवली जबाबदारी)

आयपीएल मेगा लिलावातील वयाने सगळ्यात लहान खेळाडू

वैभव सूर्यवंशी (भारत) – १३ वर्षं (फलंदाज)

आयुष म्हात्रे (भारत) – १७ वर्ष (फलंदाज)

आंद्रे सिद्धार्थ (भारत) – १८ वर्षं (फलंदाज)

क्वेना एमफाका (द आफ्रिका) – १८ वर्षं (तेज गोलंदाज)

अल्लाह गझनफर (अफगाणिस्तान) – १८ वर्षं (फिरकीपटू)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.